अद्वय हिरेंवर दादा भुसेंच्या गुंडांकडून हल्ला, ठार मारण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अद्वय हिरेंवर दादा भुसेंच्या गुंडांकडून हल्ला, ठार मारण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा गंभीर आरोप

राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. अशातच नाशिकच्या मालेगावमधून धक्कादायक बातमी समोर आली. मालेगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अद्वय हिरे मालेगावातील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले होते. यावेळी बाहेरून काही गुंडांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांना धमकावलं, अशी तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. अद्वय हिरेंवर दादा भुसेंच्या गुंडांकडून हल्ला करण्यात आला आहे. ठार मारण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊतांचे गंभीर आरोप

पराभवाच्या भीतीने शिंदे गटाचे लोक अस्वस्थ झालेत. अनेक ठिकाणी आमच्या उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसांकडून दबाव आणला जात आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. यात नाशिकचे पोलीस आयुक्त सुद्धा सामील आहेत. काल संध्याकाळी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमचे उमेदवार डॉ. अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केला. हिरे प्रचार करत असताना त्यांच्या गाड्यांवर हल्ला केला. त्यांच्याजवळ तलवारी, गावठी पिस्तुल होते. अद्वय हिरे यांना ठार मारण्याच्या दृष्टीनेच हा हल्ला झाला, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

कालच्या हल्ल्यात आमचे पाच शिवसैनिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या संदर्भात अजूनही ठोस कारवाई केलेली नाही. हे प्रकरण फक्त मालेगाव बाह्य मतदारसंघापुरतं मर्यादित नाही. असं जर पोलीस यंत्रणेचा वापर करून हल्ले होत असतील. तर यांना महाराष्ट्रात शांततेत निवडणूक होऊ द्यायची नाही हे स्पष्ट होत आहे, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची निवडणुकीच्या आधी बदली करावी. अशी आमची मागणी याचसाठी होती. कारण पोलीस यंत्रणा ही एका पक्षाच्या कामाला जुंपलेली आहे. त्यामुळे निवडणूक स्वच्छ वातावरणात होणार नाहीत, हा आमचा अंदाज खरा ठरताना दिसतोय, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई ‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मुद्दे आणि गुद्दे समोर येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या निवडणुकीत वोट जिहाद होत...
पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यानंतर सिद्धूंना सोडावा लागला कपिलचा शो; आता म्हणाले “सरदारच पाहिजे..”
“तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलंत, तो बाहेर आल्यावर तसा नाही..”; वादावर काय म्हणाली अंकिता?
जुही चावलाची वादग्रस्त पोस्ट, ‘एखाद्या गटारात राहतोय असं…’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
अमित ठाकरे यांना का मतदान करावं? मराठी अभिनेत्याने दिली 10 कारणं
कपूर, खान नाही तर बॉलिवूडमधील ‘हे’ कुटुंब सर्वांत श्रीमंत; तब्बल 10 हजार कोटींची संपत्ती, एकेकाळी विकायचे फळं
भाजपची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणा पोकळ; काँग्रेसच्या आराधना मिश्रा यांची टीका