‘तुमची त्यांना भीतीच उरली नाही’, बेधडक राज ठाकरेंचं अत्यंत कळकळीचं भाषण

‘तुमची त्यांना भीतीच उरली नाही’, बेधडक राज ठाकरेंचं अत्यंत कळकळीचं भाषण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज बोरीवलीत प्रचार सभा पार पडली. या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नागरी समस्यांवर भावना मांडली. विधासभा निवडणूक असल्याने उमेदवार आता गल्लोगल्लीत, घराघरापर्यंत प्रचारासाठी फिरत आहेत. पण निवडून आल्यानंतर हेच उमेदवार 5 वर्षे नागरिकांकडे मागे फिरुन पाहतदेखील नाहीत. हीच वास्तविकता राज ठाकरे यांनी आपल्या भाणषातून व्यक्त केली. रस्त्यांची अवस्था, फुटपाथ आणि सर्वसामान्य नागरिकांचे होणार हाल यावर राज ठाकरे यांनी प्रकाश टाकत अतिशय मार्मिकपणे भाष्य केलं. त्यांच्या भाषणातीला या मुद्द्यांमुळे त्यांच्यातील कळकळ आणि संवेदनशील स्वभावाचं दर्शन बघायला मिळत आहे. यावेळी त्यांनी विरोधकांनाही टोले लगावले.

“माझ्याकडे वेळ कमी आहे. त्यातून मुंबईचं ट्राफिक आणि त्याचा झालेला विचका, त्यातून मार्ग काढत काढत मी इथपर्यंत पोहोचलो. दिवसाला तीन-तीन, चार-चार सभा सुरु आहेत. मी आलो आहे ते तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आणि सहज चार गोष्टी सांगण्यासाठी. मला बोरवलीला सभा घ्यायचीच होती. ते यादीमध्ये नव्हतं. पण घ्यायचीच होती. मी बोरीवली मतदारसंघासाठी अत्यंत सभ्य उमेदवार दिलेला आहे. जाणीव असलेला, अभ्यास असलेला उमेदवार दिला आहे”, असं राज ठाकरे आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले.

‘कोणती डेव्हलपमेंट झाली?’

“आज बऱ्याच जणांचे जाहीरनामे जाहीर झालेले आहेत. 20 वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आज सुद्धा त्याच जाहीरनाम्यात होत्या. काँग्रेसचं तर बोलूच नका. एका बाजूला प्रगती झाली, असं म्हणायचं. पण दुसरीकडे जुनं बोरिवली चांगलं होतं असं सुद्धा वाटत आहे. याचं कारण म्हणजे कसलीही यंत्रणा लावलेली नाही. बाहेरून बदाबदा माणसं येत आहेत. एखादं शहर म्हटलं तर ठीक आहे, माणसं येणं स्वाभाविक आहे. पण जे मूळ करता आहेत त्यांना त्रास व्हायला लागला आहे. फुटपाथवर चालता येईना, रस्त्यावर गाड्या चालवता येईना, मैदानावर बागा उरल्या नाहीत. मग कोणती डेव्हलपमेंट झाली?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

‘तुम्ही बिबट्याच्या घरात गेलात’

“प्रत्येक नागरिकाला घरातून बाहेर पडल्यावर बरं वाटलं पाहिजे की मी या शहरात राहतो आहे. या बोरवलीमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे. फक्त भारतात नव्हे तर जगात इतकं मोठं नॅशनल पार्क असलेलं शहर म्हणजे फक्त मुंबई आहे. आपण बोलतो घरात बिबट्या आला. पण तुम्ही बिबट्याच्या घरात गेलात. आपलं संजय गांधी नॅशनल पार्क पवईला सुरू होतं आणि गौडबंदरला संपतं इतकं मोठं पार्क आहे. अशाप्रकारे पार्क इतर देशांकडे असतं तर त्यांनी इतकं जपलं असतं की आपण त्याची कल्पना सुद्धा नाही करू शकत”, अशी भावना राज ठाकरे यांनी मांडली.

‘आपण त्यांना प्रश्न विचारत नाहीत’

“आपले शहर बॉम्ब टाकल्यासारखी का वाटतात? काहीही चालतंय. फुटपाथ तुटले, रस्ते नाहीत, खड्डे आहेत. याचं कारण म्हणजे आपल्याला नक्की काय पाहिजे? याची कल्पना तुम्हाला सुद्धा नाही आणि राजकारण्यांना सुद्धा नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पाहिले तर तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट कळेल. शहरांना एक कॅरेक्टर लागतं. राजकारण्यांनाच कॅरेक्टर उरलं नाही. तर शहरांना कुठून येणार? त्यांच्याकडे आपलं लक्ष नाही कारण आपण त्यांना प्रश्न विचारत नाहीत”, असं राज ठाकरे रोखठोक म्हणाले.

‘त्यांना भीतीच उरली नाही’

“आतापर्यंत कोण-कोण आमदार, नगरसेवक, खासदार होऊन गेले त्यांना एकदा प्रश्न विचारा. निवडणूक आल्यावर हात जोडतात, पाया पडतात आणि निवडणुका झाल्या की पाच वर्ष तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत. तुम्ही प्रश्न विचाराल अशी त्यांना भीती वाटली पाहिजे. पण त्यांना भीतीच उरली नाही. चांगल्या जातीचा, चांगल्या पक्षाचा असा आपण मतदान करतो. पण हा चांगलं काम करतो की, नाही यावर आपण मतदान करीत नाही”, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या नावावर तुमच्याकडे मत मागायला येतात. पण तुम्हाला प्रश्न पडत नाही की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मतदान केलं पण आता बाळासाहेब ठाकरे नाहीत. नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केलं पण आपल्या बोरिवलीमधील प्रश्न नरेंद्र मोदींना कसे सांगायचे? पाच वर्ष कशाला म्हणतात कळतं का?”, असं राज ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात
राज्य विधानसभा निवडणुकीत मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसंतसे नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे. अजितदादा यांच्या कालच्या स्फोटक मुलाखतीनंतर आता...
दुश्मन एकत्र येतात तर आम्ही का नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ, उद्धव ठाकरे यांना केले मोठे आवाहन
पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं; जुही चावलाची उडवली होती खिल्ली, सत्य जाणून तुम्हीही व्हाल भावूक!
Train Accident – तेलंगणातील पेड्डापल्लीमध्ये रेल्वे अपघात, 11 डबे रुळावरुन घसरले
Sunita Williams Health – माझी तब्येत ठिक…सुनीता विल्यम्सने तब्येतीबाबत दिली माहिती
गुजरातमधील रुग्णालयाचा प्रताप, आयुष्यमान योजनेच्या लाभासाठी 19 जणांची अँजिओप्लास्टी; दोघांचा मृत्यू
Video – उद्धव ठाकरे यांची तोफ धाराशिवमध्ये धडाडली