ठरलं! अभिजित बिचुकले ‘या’ विधानसभा मतदारसंघातून लढवणार निवडणूक, आदित्य ठाकरेंनंतर आता या दिग्गज नेत्याविरोधात रिंगणात
विधानसभेचंं बिगूल वाजलं आहे, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही, त्यांची फॉर्म भरण्यासाठी लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गेल्यावेळी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार ते बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी अभिजित बिचुकले हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं समोर येत आहे.
आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक
गेल्यावेळी अभिजित बिचकुले यांनी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे विजयी झाले होते. त्यानंतर आता अभिजित बिचुकले हे आता बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्यामध्ये प्रमुख लढत आहेत. या मतदारसंघात आता अभिजित बिचुकले यांना किती मतदान होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
बारामतीमध्ये काटे की टक्कर
बारामतीमध्ये यावेळी राष्ट्रवादी आजित पवार गटाकडून स्वत: आजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बारामतीमध्ये काका विरोधात पुतण्या असा हा सामना रंगणार आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला, आता विधानसभेला पवार कुटुंबातीलच दोन सदस्य आमने-सामने आहेत. या निवडणुकीमध्ये मतदार कोणाच्या बाजुनं कौल देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List