राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्याविरोधत 66 गुन्हे; 51 जणांना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्याविरोधत 66 गुन्हे; 51 जणांना अटक

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याविरुध्द एकूण 66 गुन्हे नोंद केले असून, 51 जणांना अटक केली आहे. या दाखल गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु 1 हजार 400 लिटर, देशी मद्य 45.9 बल्क लिटर, विदेशी मद्य 56.7 बल्क लिटर, गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्य 9 हजार 274.63 बल्क लिटर, रसायन 27 हजार 205 लिटर तसेच मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा आयशर टेम्पो व मारुती स्विफ्ट कार या वाहनांसह एकूण 1 कोटी 19 लाख 14 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून, त्याविरुध्द कठोर कारवाई करण्याकरिता या विभागाकडून चार पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील/बेकायदेशीर मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारु धंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

जानेवारी 2024 पासून अद्यापपर्यत महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 93 नुसार एकूण 28 प्रकरणात 16 लाख रुपये एवढ्या रक्कमेची चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे सतत अवैध दारु धंद्यात गुंतलेल्या आरोपीत इसमांकडून घेण्यात आली आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई- गोवा, कोल्हापूर- रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गावरुन प्रवाशी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे. गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये याकरिता कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलीसांसमवेत अचानकपणे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्दची कारवाई या पुढेही सुरुच राहील.

रत्नागिरी जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतुक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास उत्पादन शुल्क विभागाचा व्हॉट्स अॕप क्रमांक- 8422001133 व टोल फ्री क्रमांक 18002339999 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी केले आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी/खबर देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का? भाजपा आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का? भाजपा आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ
राज्यात निवडणुकीला रंग चढला आहे. प्रचाराच्या तोफा आता थोड्याच दिवसात थंडावतील. त्यापूर्वी आमदार, नेते आणि कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रचार करत...
निवडणुकीच्या धामधुमीत कॉमनमॅनच्या भावनांना साजेसं रॅप साँग; तरुणांकडून भरभरून प्रतिसाद
‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजेवर संकट; लीला यातून कसा काढणार मार्ग?
“ब्रेकअपनंतर सिंघम अगेनच्या सेटवर अर्जुनची अवस्था…”; रोहित शेट्टीकडून खुलासा
“त्यांना गमावल्यानंतर..”; वडिलांच्या आत्महत्येबद्दल पहिल्यांदाच मलायका अरोरा व्यक्त
मतदान करणाऱ्यास पेट्रोल फ्री मिळणार
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ, व्हीव्हीआयपी रांगेत तरुणाची घोषणाबाजी; सुरक्षारक्षकांची धावपळ