बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा उदारपणा, अयोध्येतील माकडांसाठी दान केले एक कोटी
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा आपल्या दिलदारपणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अक्षय कुमारने अयोध्येच्या माकडांसाठी आपला खजिना उघडला आहे. अक्षयने माकडांच्या जेवणासाठी एक कोटी रुपये दान केले आहेत.
जगतगुरु स्वामी राघवाचार्य जी महाराज यांची अंजन्या सेवा ट्रस्ट अयोध्येतील माकडांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करते. या ट्रस्टने जेव्हा अक्षय कुमारला या पवित्र कार्याबद्दल सांगितले तेव्हा अक्षयने तात्काळ या ट्रस्टला देणगी देण्याचा निर्णय घेतला. शिवाय शक्य ती सर्व मदत करेन असेही सांगितले.
अक्षय कुमार एक चांगला माणूस, देशाचा चांगला नागरिक आहे. स्टाफ असो, क्रू किंवा सहकलाकार असो, तो सर्वांशीच नेहमी चांगला वागतो. अक्षयने केवळ देणगीच दिली नाही तर त्याचे आई-वडील अरुणा भाटिया आणि हरी ओम तसेच त्याचे सासरे राजेश खन्ना यांच्या नावाने सेवा करण्याविषयीही सांगितले, असे या संस्थेच्या संस्थापक विश्वस्त प्रिया गुप्ता यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List