महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित; महिलांना महिन्याला 3 हजार रुपये, 500 रुपयांत वर्षाला 6 गॅस सिलिंडर, वाचा सविस्तर
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर जनतेला 25 लाख रुपयांचा विमा, वर्षाला 500 रुपयांत सहा गॅस, तसेच महालक्ष्मी योजनेतून महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देणार असे आश्वासन महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. यावेळी खरगे यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनामा महाराष्ट्रनामातली आश्वासनं वाचून दाखवली.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर कंत्राटी भरती रद्द करणार असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तसेच 300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत, दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन, महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार, एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार, महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार, अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार, बार्टी,महाज्योती,सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार, सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी,नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट, 2.5 लाख नोकरभरती, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती, जातीनिहाय जणगणना तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
पहिल्या 100 दिवसांत
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिल्या 100 दिवसांत महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये देणार. महिलांना बसचा मोफत प्रवास, सहा गॅस सिलेंडर 500 रुपयांना, जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला 18 वर्षानंतर 1 लाख रुपये देणार.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List