मिरची ते भेंडी… पोळपाट ते वॉशिंग मशीन; अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून 190 चिन्हे जाहीर
विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली आहे. उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून, निवडणूक लढवणाऱया अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने 190 निवडणूक चिन्हे जाहीर केली आहेत. यातील काही चिन्हे पारंपरिक, तर काही नव्या ढंगाची, काही मजेशीर आहेत.
सध्या सर्वच पक्षांतील उमेदवारांची निवडणूक अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. पैठणच्या संतपीठ येथील प्रशासकीय इमारतीच्या निवडणूक कार्यालयाबाहेर उमेदवारांसाठीच्या मुक्त चिन्हांची यादी लागली आहे. यामध्ये अगदी भेंडी, मिरची, मटर अशी भाज्यांची नावे असलेली निवडणूक चिन्हे दिसत आहेत. याव्यतिरिक्त नेलकटर, ब्रश, लायटर, पाणी गरम करण्याचे रॉड असे घरातील लहान-मोठे साहित्य निवडणूक चिन्ह म्हणून यादीत दिसत आहे.
काय आहेत निवडणूक चिन्हे
– फळ व भाज्या – फणस, सफरचंद, कलिंगड, अक्रोड, द्राक्षे, फ्लॉवर, सिमला मिरची, हिरवी मिरची, मटर, भुईमूग, आले, भेंडी.
– घरातील साहित्य – जेवणाचा डबा, फ्रिज, टीव्ही, लॅपटॉप, मशीन, जातं, पोळपाट-लाटणं, टोस्टर, वॉशिंग मशीन, टूथपेस्ट, ब्रश, पाणी गरम करण्याचे रॉड, लायटर, कडी, पेन स्टँड, टाय आदी.
– अन्य साहित्य – नेकलेस, कानातले, बांगडय़ा, अंगठी, कपडे, बूट, कोट, कोल्हापुरी चप्पल, बेल्ट, पंचिंग मशीन, स्वीच बोर्ड, हातगाडी, विटा, खाट, पेट्रोलपंप, किचनमधील सिंक, करवत आदी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List