AJIT PAWAR EXCLUSIVE : महायुतीत सूर का जुळत नाही? अजित पवार म्हणाले….

AJIT PAWAR EXCLUSIVE : महायुतीत सूर का जुळत नाही? अजित पवार म्हणाले….

महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला होता. यानंतर खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांमधील सूर जुळत नसल्याची चर्चा आहे. याबाबत खुद्द अजित पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला रोखठोक मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेडिंज एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. यावेळी अजित पवारांनी विविध प्रश्नांवर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.

महायुतीच्या नेत्यांसोबत सूर का जुळत नाही?

“कसं आहे मी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो. एकंदरीत ज्या पद्धतीने देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार सुरु आहे. त्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टीकोनातून इथे आलो. त्यातून महाराष्ट्राचा सर्वांगिन विकास व्हावा, मतदारांचे आमदारांच्या मतदारसंघांमधील प्रश्न सुटावेत ही भावना घेऊन आलो. आम्ही येताना तिथल्या प्रमुख व्यक्तींशी बोलून आलो आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

‘काही वक्तव्ये आली, पण मी अडकून पडलो नाही’

“प्रत्येक पक्षात वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. त्यामुळे मागच्या वेळेस काही वक्तव्ये आली, ते माझ्याही कानावर पडले. मी त्यावर फार अडकून पडलो नाही. मी मुळातच अमित शाह आणि इतर महत्त्वाच्या नेतेमंडळींसोबत चर्चा करुन आलेलो असल्यामुळे माझं काम भलं आणि मी भलं अशी माझी भूमिका आहे. वरिष्ठांसोबत माझे संबंध चांगले आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र जात आहोत. कुठल्याही पक्षात काही वेगवेगळे मतप्रवाह असतात. ते मतप्रवाह आले की, मीडिया ते विषय उचलून धरते. ठिक आहे. मत मतांतर असू शकतात. मला त्यावर बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

‘अलिकडे राजकारणाचा स्तर घसरला’

“सदाभाऊ खोत हे महायुतीच्या घटकपक्षांमधील एक आहेत. मी खोतांच्या वक्तव्याबद्दल तोबततोब प्रतिक्रिया दिली. त्यांनी लगेच दिलगिरी व्यक्त केली. अलिकडे राजकारणाचा स्तर घसरला आहे. मी नेहमी विचार करतो, यशवंतराव चव्हाण यांनी सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राजकारणाला सुरुवात केली, त्यांनी जो सुसंस्कृतपणा दाखवला, विरोधकांबाबत बोलताना टीका-टीप्पणी करत असताना एक उंची असली पाहिजे. तेच पुढे वसंतराव नाईकांनी पुढे नेलं. तेच पुढे वसंतदादांनी, तेच पुढे शरद पवारांनी, तेच पुढे विलासराव देशमुखांनी नेलं, असं आपण पाहात आलो. काही जण बोलल्यानंतर मी लगेच प्रतिक्रिया दिली. मी काल दौऱ्यात होतो. त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली मी ऐकलं आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘इथे’ फिल्मस्टार्सच्या नावावर होते गाढवांची विक्री; ​सलमान-शाहरुखपेक्षाही लॉरेन्स गाढवावर लाखोंची बोली ‘इथे’ फिल्मस्टार्सच्या नावावर होते गाढवांची विक्री; ​सलमान-शाहरुखपेक्षाही लॉरेन्स गाढवावर लाखोंची बोली
मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे गाढवाचा मेळा भरवला जातो. चित्रकूट जिल्ह्यात दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गाढवाचा सुरु होतो, जो पुढील काही...
शास्त्र असतं ते! खेळाडू नेहमी च्युइंगम का चघळतात? फॅशन नसून आहे खास कारण
हे अख्खं सरकार कचराकुंडीत टाकण्यासारखं आहे, द्या कचराकुंडीत टाकून; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वापरून घेत आहे: जयंत पाटील
Justice Chandrachud Retires: सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड निवृत्त, शेवटच्या दिवशी झाले भावुक; म्हणाले….
Ladki Bahin Yojana : ‘ते कदापि शक्य नाही’, खर्चाचा लेखाजोखा मांडत अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य
अजितदादामध्ये बदल का झाला…अजित पवार यांनी सांगितले ते कारण