मोठी बातमी! मविआच्या जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला समोर, कोणाच्या वाट्याला किती जागा?

मोठी बातमी! मविआच्या जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला समोर, कोणाच्या वाट्याला किती जागा?

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.मात्र अजूनही महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा सुटताना दिसत नाहीये. सुरुवातील महाविकास आघाडीमधील तीन प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना प्रत्येकी 85 विधानसभा मतदारसंघ असा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र उर्वरीत जागांवर कोणताही तोडगा निघाला नव्हता.अखेर आता जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार जागा वाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यावर तीनही घटक पक्षांचं एकमत झालं आहे. नव्या फॉर्म्यल्यानुसार आता महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या वाट्याला प्रत्येकी 90 जागा येणार आहेत. तर उर्वरीत 18 जागा या मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत.समोर आलेल्या माहितीनुसार समान जागा वाटपाचं सुत्र ठरलं असून, लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव

सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये 85-85-85 फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. मात्र उर्वरीत जे 28 सीटं होते, त्यावर महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचं एकमत होत नव्हतं.या मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये दावे-प्रतिदावे सुरू होते.यातील बहुतांश जागेवर दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला होता. मात्र सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार यावर तोडगा काढण्यात यश आलं असून नव्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार तीन्ही पक्षांना प्रत्येकी 90 जागा तर उर्वरीत 18 जागा या मित्र पक्षांना सोडण्यात येणार आहेत.

दरम्यान जागा वाटपावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. तीनही पक्षांकडून उमेदवारांच्या पहिल्या याद्या समोर आल्या आहेत. ज्या इच्छुकांना तिकीट मिळालं नाही, त्यांची बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान सर्वच पक्षांसमोर असणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सलमानला धमकी देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीच्या लोकेशनबाबत पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, प्रकरणाला नवं वळण सलमानला धमकी देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीच्या लोकेशनबाबत पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, प्रकरणाला नवं वळण
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अभिनेता सलमान खानला अनेकवेळा धमकीचे मेसेज प्राप्त झाले आहेत. गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सलमान खानला पुन्हा...
तुम्हाला सातत्याने मायग्रेनचा त्रास सतावतोय? ‘हे’ करा, तज्ज्ञांनी सांगितल्या ‘या’ 3 टिप्स करतील काम
यशस्वीच्या भावाची तेजस्वी कामगिरी, रणजी करंडकात दमदार खेळीने सर्वांना केले प्रभावित
‘इथे’ फिल्मस्टार्सच्या नावावर होते गाढवांची विक्री; ​सलमान-शाहरुखपेक्षाही लॉरेन्स गाढवावर लाखोंची बोली
शास्त्र असतं ते! खेळाडू नेहमी च्युइंगम का चघळतात? फॅशन नसून आहे खास कारण
हे अख्खं सरकार कचराकुंडीत टाकण्यासारखं आहे, द्या कचराकुंडीत टाकून; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वापरून घेत आहे: जयंत पाटील