Poonam Mahajan : महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल; पूनम महाजन यांचा रोख कुणाकडे? खासदारकीचे तिकीट कापल्याबद्दल जाहीर नाराजी

Poonam Mahajan : महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल; पूनम महाजन यांचा रोख कुणाकडे? खासदारकीचे तिकीट कापल्याबद्दल जाहीर नाराजी

महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. त्यातच भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी ऐन या धामधुमीत मोठी वक्तव्य केली आहे. त्यांच्या वक्तव्याने कालपासून राजकारण ढवळून निघालं आहे. प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी आज या वक्तव्याचं पुनरुच्चार केला. त्यासोबतच महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल, त्यामुळे माझं खासदारकीचं तिकीट कापण्यात आलं, असं वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. पूनम महाजन यांचा रोख कुणाकडे आहे, याची आता चर्चा रंगली आहे.

पूनम महाजनं यांच्या वक्तव्याने खळबळ

माझं तिकीट का कापण्यात आलं हे अद्याप मला सांगण्यात आलं नसल्याचे पूनम महाजन म्हणाल्या. ज्यावेळी एखाद्या विद्यमान खासदाराचं तिकीट कापल्या जातं. त्यावेळी त्याविषयीची कारणमीमांसा करण्यात येते. त्यासाठी काही कारण देण्यात येते. पण आपल्याला असं कोणतंही कारण देण्यात आलं नसल्याच्या त्या म्हणाल्या. काँग्रेसचा बालेकिल्ला भेदून आम्ही हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला तयार केला. माझं तिकीट का कापण्यात आलं, याची माहिती अद्याप मला देण्यात आली नाही. मी राज्यात काम केलं आहे. मी दिल्लीत काम केलं आहे. संपूर्ण देशात मी पक्षाचं काम केलं आहे. तुम्ही येथं चुकलात, ही चुकीची गोष्ट केली असं कोणी मला म्हटलेलं नाही. कोणी माझ्यावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल असे उद्धगार पूनम महाजन यांनी काढले.

मी अजूनही भाजपमध्येच

ठाकरे कुटुंबियांशी माझे आणि माझ्या कुटुबियांचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. माझं तिकीट कापल्यानंतर ठाकरे यांनी मला फोन केला होता. वैचारिक मतभेद असले तरी आम्ही हे संबंध जपलं आहेत. ठाकरे आणि महाजन कुटुंबातील नातं हे राजकारणा पलीकडलं आहे. मी अद्याप ही भाजपमध्येच आहे. मी गेल्या सहा महिन्यापासून दुसरीकडे कुठे गेले का? असा सवाल त्यांनी केला. आता वडिलांच्या या हत्येप्रकरणात आपण केंद्रीय गृहखात्याला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने आता पक्षातंर्गत काही मतभेद तर नाही ना? प्रमोद महाजन यांच्या कन्येच्या राजकीय प्रवासात कोण खोडा घालत आहे, अशी चर्चा होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : ‘ते कदापि शक्य नाही’, खर्चाचा लेखाजोखा मांडत अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य Ladki Bahin Yojana : ‘ते कदापि शक्य नाही’, खर्चाचा लेखाजोखा मांडत अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवार...
अजितदादामध्ये बदल का झाला…अजित पवार यांनी सांगितले ते कारण
AJIT PAWAR EXCLUSIVE : महायुतीत सूर का जुळत नाही? अजित पवार म्हणाले….
भाजपचा नवाब मलिकांना नकार असताना तुम्ही तिकीट का दिलं? अजित पवारांची EXCLUSIVE प्रतिक्रिया
बॉलिवूडवर पुन्हा ‘अंडरवर्ल्ड’ दहशत? सलमान, शाहरुखनंतर आता ‘या’ अभिनेत्याला धमकी
अविवाहित असतानाही कोणाच्या नावाचे सिंदूर लावते ‘ही’ अभिनेत्री; नेटकऱ्यांनी घेतलं एजाज खानचे नाव
अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवातील अडथळे दूर करा