दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल शाहरुख खानकडून धक्कादायक खुलासा, ‘अचानक गाणं वाजू लागलं आणि…’
Shah Rukh Khan On Divya Bharti Death: दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती हिच्या मृत्यूला अनेक वर्ष झाली आहेत. वयाच्या 19 व्या वर्षी दिव्या भारती हिचं निधन झालं. अभिनेत्रीच्या निधनाला 30 वर्ष झाली असली तरी देखील दिव्याचं निधन आजही एक रहस्य आहे. आजही दिव्या भारती हित्या मृत्यूबद्दल अनेक खुलासे समोर येतात. दिव्याच्या निधनाबद्दल अभिनेता शाहरुख खान याने देखील धक्कादायक खुलासा केला होता. शिवाय अभिनेत्रीच्या स्वभावाबद्दल देखील किंग खानने सांगितलं होतं.
एका जुन्या मुलाखतीत शाहरुख खान याने मोठं वक्तव्य केलं होतं. शाहरुख खान म्हणाला होता, ‘एका अभिनेत्रीच्या रुपात दिव्या भारती फार दमदार होती. मी गंभीर स्वभावाचा मुलगा होतो आणि दिव्या कायम आनंदी असायची. मला आठवत आहे. मी सी रॉक हॉटेलमध्ये डबिंग पूर्ण केली होती. ‘दिवाना’ सिनेमासाठी डबिंग केली होती.’
‘हॉटेलमधून बाहेर निघाल्यानंतर मला दिव्या दिसली. माझ्याकडे पाहिलं आणि दिव्या म्हणाली, ‘तू फक्त अभिनेता नाही तर, एक इंस्टीट्यूशन आहे. दिव्या असं का म्हणाली, तेव्हा मला कळलं नाही. पण जेव्हा कळलं तेव्हा समजलं त्या एका शब्दात फार काही दडलं होतं…’ असं शाहरुख खान म्हणाला.
दिव्याच्या मृत्यूबद्दल शाहरुखने केलेला खुलासा
शाहरुख म्हणाला, ‘मी तिच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. मी दिल्लीमध्ये होतो. झोपलो होतो आणि सकाळी अचानक ‘ऐसी दिवानगी’ गाणं वाजू लागलं. त्यानंतर कळलं दिव्याचं निधन झालं आहे. बाल्कनीतून दिव्या खाली पडली. तिच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मला धक्का बसल… मला तिच्यासोबत आणखी सिनेमांमध्ये काम करायचं होतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
दिव्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, फार कमी वयात आणि कमी कालावधीत अभिनेत्रीने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. दिव्याच्या शेवटच्या सिनेमाचं नाव ‘क्षत्रिय’ होतं. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिचे ‘रंग’, ‘थोली मुधु’ आणि ‘शतरंज’ सिनेमे प्रदर्शित झाले. आजही दिव्या कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List