वधू शोधण्यास मॅट्रीमोनी पोर्टल ठरले अपयशी, ग्राहक मंचाने ठोठावला 60 हजारांचा दड
बंगळुरुमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. बंगळुरुच्या ग्राहक मंचाने एका तरुणासाठी वधू शोधण्यास अपयशी ठरलेल्या मॅट्रीमोनी पोर्टलला तब्बल 60 हजारांचा दंड ठोठावला आहे. जाणून घेऊया नेमके काय प्रकरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुच्या एम एस नगरमध्ये राहणारे विजय कुमार आपल्या मुलासाठी वधूच्या शोधात होते. 17 रोजी विजय कुमार आपल्या मुलाचे आवश्यक कागदपत्रे आणि फोटो घेऊन मॅट्रीमोनी पोर्टलवर पोहोचले. दिलमिल मॅट्रीमोनीने वधू शोधण्यासाठी त्यांच्याकडून 30 हजार रुपये घेतले होते. विजय कुमार यांनी त्याच दिवशी सर्व पैसे दिले. दिलमिल मॅट्रीमोनीने त्यांना सांगितले की, त्यांना 45 दिवसांच्या आत वधू शोधून देण्याची हमी दिली.
45 दिवसानंतर दिलमिल मॅट्रीमोनी बालाजी यांच्यासाठी वधू शोधू शकले नाही. त्यामुळे विजय कुमार यांनी अनेकदा त्यांच्या कार्यालयात फेऱ्या मारल्या. त्यांना अनेकदा वाट बघण्याबाबत सांगितले आणि त्यामुळे आणखी उशीर झाला. 30 एप्रिल रोजी विजय कुमार दिलमिलच्या कार्यालयात गेले आणि त्यांचे पैसे परत मागायला लागले. मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला आणि शिवीगाळ केली.
त्यानंतर विजय कुमार यांनी 9 मे रोजी दिलमिल पोर्टलला कायदेशीर नोटीस पाठवली. मात्र तिथून त्याचे काहीच उत्तर आले नाही. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने 28 ऑक्टोबर रोजी एका आदेशात सांगितले की, तक्रारदाराला आपल्या मुलासाठी योग्य वधूसाठी योग्य प्रोफाईल मिळाली नाही आणि ज्यावेळी तक्रारदार त्यांच्या कार्यालयात गेले, त्यावेळी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांचे पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे ग्राहक मंचाने मॅट्रिमोनी पोर्टलवर दंड लावला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List