महायुतीचे सरकार बेईमान, रश्मी शुक्ला यांच्या बदलीच्या निर्णयाचे विजय वडेट्टीवार यांनी केले स्वागत
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने पदावरून हटवले आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. महायुतीचे सरकार बेईमानी करत होते हे स्पष्ट झाले असे वडेट्टीवार म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून वडेट्टीवार म्हणाले की, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. महायुतीचे सरकार बेईमानी करत होते हे आज स्पष्ट झाले.
गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची अशी कोणती मजबुरी महायुती सरकारची होती? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने होऊ नये म्हणून त्यांना सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. असंवैधानिक मार्गाने आलेल्या सरकारने असंवैधानिक मार्गाने अधिकाऱ्यांना पदांवर बसवले होते हे आज स्पष्ट झाले आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊन सत्तेचा दुरुपयोग महायुती सरकारने केला होता असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला होता.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.
महायुतीचे सरकार बेईमानी करत होते हे आज स्पष्ट झाले.
गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची अशी कोणती मजबुरी…— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 4, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List