भरधाव वाहनाने तीन दुचाकींसह सहा जणांना चिरडले, पाच जणांचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक

भरधाव वाहनाने तीन दुचाकींसह सहा जणांना चिरडले, पाच जणांचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक

भरधाव बोलेरो गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकींसह सहा नागरिकांना चिरडल्याची घटना नंदुरबारमध्ये घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. लोय पिंपळोद गावाजवळ शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

सदर बोलेरो नंदुरबारकडून धानोराकडे चालली होती. गाडीचा वेग अधिक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे हा अपघात घडला. योगेश नाईक, राहुल वळवी, अनिल मोरे, चेतन नाईक, श्रीकृष्ण ठाकरे अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कृष्णा भिल असे जखमीचे नाव आहे.

अपघातात तिन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला. तसेच बोलेरो गाडीही उलटली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 105, 281, 324 (5) सह मोटार वाहन कायदा 184, 134/187 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवज्योत सिंग सिद्धूंनी सांगितलं कपिल शर्माचा शो सोडण्यामागचं कारण; म्हणाले.. नवज्योत सिंग सिद्धूंनी सांगितलं कपिल शर्माचा शो सोडण्यामागचं कारण; म्हणाले..
कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांना पाच वर्षांनंतर पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या...
‘या’ अभिनेत्रीला ओळखलत का? व्हायरल व्हिडीओ क्लिपमुळे रातोरात स्टार बनली
लग्नाआधीच होणाऱ्या पतीसोबत सासरी ‘नाईट स्टे’ केल्याने भडकली सासू? समीरा रेड्डीचा खुलासा
गोविंदाची रॅली दरम्यान प्रकृती खालावली, तात्काळ रुग्णालयात दाखल, कशी आहे प्रकृती?
‘अशा पद्धतीने नीच वागून..’; भडकलेल्या नयनताराचं धनुषला खुलं पत्र
बॉबी देओलसोबत लग्न केलं असतं तर कधीच…, प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
हाडांच्या मजबूतीसाठी रोज खा हे 3 पदार्थ, कॅल्शियमची भासणार नाही उणीव