आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे, त्यालाच मराठा म्हणतात; मनोज जरांगे यांचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल
राज्यात लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा परिणाम दिसून आला. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.आता जरांगे यांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत किती दिसणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे, त्यालाच मराठा म्हणतात, असे ठणकावत त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
राखीव मतदारसंघात दलित समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार आहे. इतर ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार असतील. इतर छोट्यामोठ्या सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. निवडणुकीत माझा समाज एकगठ्ठा राहील. इतरांचे काही सांगत नाही. आमचे मराठे 100 टक्के एकत्र राहणार आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी बेजार केले म्हणून लढत आहोत. आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे. त्यालाच मराठा म्हणतात, असे मनोज जरांगे यांनी सांगत फडणवीसांवर निशाणा साधला.
राजकारणाचे वेड लागू देऊ नका. आमदार, खासदार होण्याची स्वप्न पाहू नका. आपल्याला समाजाची नाराजी ओढवून घ्यायची नाही. आपल्याला आधार पाहिजे. आम्हाला गरीब मराठ्यांना हक्काचा अधिकार करायचा आहे. उमेदवारी नाही मिळाली तरी नाराज होऊ नका,आपल्याला एकत्र राहयचे आहे. निवडणुका हे आपले ध्येय नाही. आपल्या समजाला त्यांचा हक्क मिळवण्यासाठी आपण लढत आहोत, असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List