बंडखोरांनी मुंबईत मिंधे-भाजपची डोकेदुखी वाढवली

बंडखोरांनी मुंबईत मिंधे-भाजपची डोकेदुखी वाढवली

मुंबईत मिंधे आणि भाजपमध्ये तिकीट वाटपावरून नाराजी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मिंधे गटाच्या स्वीकृती शर्मा, भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर महायुतीला पाठिंबा देणाऱ्या गीता जैन यांनी भाजपचे नरेंद्र मेहता यांच्या विरोधात अपक्ष म्हणून अर्ज केला आहे. या सर्वांचे बंड थंड करण्याचे आव्हान महायुतीसमोर निर्माण झाले आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी हे गेली अनेक वर्षे खासदार म्हणून निवडून येत होते. 2004 आणि 2009 मध्ये ते आमदार होते. लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. लोकसभेत तिकीट कापल्यामुळे गोपाळ शेट्टी हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते, पण उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले.

मिंधे गटाच्या स्वीकृती शर्मा अपक्ष
लोकसभा निवडणुकीदरम्यान एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अंधेरी पूर्व येथून कामालाही सुरुवात केली होती, मात्र येथून शिंदे गटाने भाजपमधून मुरजी पटेल यांना आयात करून मैदानात उतरवले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या स्वीकृती शर्मा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यांची मुलगी निकिता शर्मा यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

पडेल नरेंद्र मेहतांना पुन्हा उमेदवारी
भाजपने मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. पुढे गीता जैन यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला होता, पण तरीही भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे जैन यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

गोपाळ शेट्टी म्हणतात, आता पक्षानं तिकीट दिलं तरी घेणार नाही!
बोरिवली विधानसभेतून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी महायुतीत बंडाचे निशाण फडकावले आहे. गोपाळ शेट्टी यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रत्येक वेळी या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार लादला जातो. स्थानिक कार्यकर्त्यांकर अन्याय होतोय. त्यामुळे बोरिकलीकरांच्या सन्मानासाठी मी निकडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. आता पक्षाने तिकीट दिले तरी मी घेणार नाही, असे स्पष्ट करत गोपाळ शेट्टी यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारले आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का असून त्याचे पडसाद महायुतीत इतरत्र उमटण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाविकास आघाडीत CM कोण होणार? उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, थेट पक्का फॉर्म्युलाच सांगीतला महाविकास आघाडीत CM कोण होणार? उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, थेट पक्का फॉर्म्युलाच सांगीतला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रत्येक दिवशी नवनवीन मुद्दे समोर येतात. त्यात एक मुद्दा जास्त चर्चिला गेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी...
सूरज चव्हाणच्या आयुष्यातील खरा ‘बिग बॉस’ कोण?; अंकिताच्या व्हीडिओनंतर चाहत्यांना प्रश्न
“या दलदलीत मला पडायचं नाही..”; सूरजसोबतच्या वादावर अंकिताने स्पष्ट केली तिची बाजू
अमिषा पटेल 49 व्या वर्षी श्रीमंत उद्योजकाच्या मिठीत, फोटो तुफान व्हायरल, कोण आहे ‘तो’?
“माझ्याच ऑफिसमध्ये येऊन बोलणार की शक्तीमान..”; रणवीर सिंहवर का भडकले मुकेश खन्ना?
‘पुष्पा 2’मधील आयटम साँगसाठी श्रीलीलाला मिळालं इतकं मानधन; समंथापेक्षा 60% कमी फी
भ्रष्ट महायुती सरकार उलथवून टाका – शरद पवार