परत एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवलंय – आदित्य ठाकरे
या मिंधे सरकारवरती जनतेचा विश्वास नाहीए त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने परत एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणायचंच ठरवलं आहे, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
”गेल्या दोन वर्षांपासून आमचा प्रचार सुरू आहे. महाराष्ट्राची जनता सर्व काही जाणून आहे. महाराष्ट्रातील तरुण आज हालबेहाल होऊन फिरत आहे, नोकर्या शोधत आहे. पण रोजगाराच्या संध्या सगळ्या गुजरात्यांनी पळवल्या आहेत. तसेच शेतकरी आत्महत्या करत आहेत पण कोणीही मदतीला उभे राहीले नाही. शेतकऱ्यांवर अनेक संकटं येऊन गेली. पण त्यांच्या सोबत कोणीही उभे राहिलं नाही. कुठे ना कुठे तरी या सरकारवरती विश्वास नाहीच आहे हे दिसतंय. पण, परत एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवलं आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
लवकरच उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सभा घेणार असल्याचे देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ”उद्धव ठाकरे महाराष्ट्रभरात सगळीकडे फिरणार आहेत. महाविकास आघाडीचे जिथे जिथे उमेदवार आहेत तिथे तिथे आम्ही फिरू, एकमेकांसाठी प्रचार करत राहू आणि महाराष्ट्राच्या हिताचं सरकार 23 तारखेला महाविकास आघाडीच्या रुपात आलेलं तुम्ही बघाल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
सदा सरवणकर यांच्यावरील दबावाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ”श्रीनिवास वनगा यांनी स्वत:ची भावना व्यक्त केली. त्यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. आता सदा सरवणकर यांच्यावर दबाव आहे. स्वत:च्या पक्षाच्या वाटाघाटीसाठी ते सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घ्यायला लावणार का? हे आपल्याला बघायला मिळेल”
हॅलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवल्याच्या प्रकारावरून आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांवर निशाणा साधला. ”दोन वर्ष झालं आपल्याला सांगत होते की मी एक गरीब शेतकरी आहे. आणि आता यांनी हेलिकॉप्टरने माणूस नाही तर AB फॉर्म पाठवला. म्हणजे विचार करा पैशांची उधळपट्टी किती चाललीये यांची”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List