आम्ही किती दिवस सतरंज्या उचलायच्या, नाराजांचा विनोद तावडेंना सवाल
आम्ही किती दिवस सतरंज्या उचलायच्या, असा थेट सवाल केल्याने तावडे यांची तंतरली. त्यानंतर नाशिक पूर्व मतदारसंघातील पाच ते सहा माजी नगरसेवक, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील दोन ते तीन माजी नगरसेवक, नाशिक पश्चिम मतदारसंघातील सहा ते सात माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी तावडे यांनी चर्चा केल्याचे समजते.
‘पक्षाकडून यावेळी आयारामांना पदांची खिरापत वाटली गेली. आम्ही किती दिवस सतरंज्या उचलायच्या, असा थेट सवाल नाशिक येथील नाराजांनी भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांना केला. तावडे सोमवारी भाजपाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना उपस्थित होते. त्यांनी नाराज माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा केली. यावेळी नाराजांनी आपली भूमिका मांडताना तावडेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. पक्षात आयारामांना संधी दिली जाते. निष्ठावंतांची कदर केली जात नाही. उमेदवारी वाटप करताना दुजाभाव केला जातो. त्यामुळे पक्षनिष्ठा किती दिवस बाळगायची? पक्षावर एकतर्फी प्रेम किती दिवस करायचे, असे सवाल केले? प्रश्नांना उत्तर देत तावडेंनी सर्वांनी समजूत काढली.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराजी मोठय़ा प्रमाणात दिसून येतेय. अन्य पक्षातील लोकांनी संधी दिल्याने स्थानिक नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. नाशिकमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. याचा जाब स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी तावडेंना विचारला. आम्ही किती दिवस सतरंज्या उचलायच्या, असा थेट सवाल नाराजांनी केला. यावर तुमच्यावर भविष्यात कोणताही अन्याय होणार नाही. याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाची असेल, असे आश्वानस विनोद तावडे यांनी प्रश्न विचारणाऱ्या संबंधितांना दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List