कॅनडात परदेशी कामगारांना नोकरी देण्याआधी कळवावे लागणार
कॅनडात पुढील वर्षीपासून ‘कॅनडा फर्स्ट’ लागू करण्यात येणार आहे. या नियमानुसार कंपन्यांना आता नोकऱ्यांमध्ये कॅनडाच्या नागरिकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. परदेशी कामगारांना नियुक्त करण्यापूर्वी सरकारला कळवावे लागेल. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टडो यांनी 2025 मध्ये हा नियम लागू करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. दरम्यान, हा निर्णय तात्पुरता असून कॅनडाच्या लोकसंख्येतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही टडो यांनी स्पष्ट केले आहे.
पॅनेडियन कंपन्यांना आता तात्पुरत्या आधारावर परदेशी कामगारांना कामावर घेण्यापूर्वी त्यांना पात्र पॅनेडियन नागरिक सापडले नाहीत, असे घोषित करावे लागेल. टडो सरकारच्या या निर्णयामुळे स्थलांतरित आणि तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते, बेरोजगारीचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती निर्माण झाली आहे. कॅनडातील शॉपिंग मॉल्स, फूड स्टोअर्स आणि रेस्टॉरंटमध्ये मोठय़ा संख्येने हिंदुस्थानी विद्यार्थी काम करत आहेत. 2023 मध्ये कॅनडात हिंदुस्थानी अस्थायी कामगारांची संख्या सर्वाधिक होती. एकूण 1.83 लाख अस्थायी कर्मचाऱ्यांपैकी 27 हजार हिंदुस्थानी होते.
कोरोना महामारीनंतर कामगारांची कमतरता भासू लागली. त्यामुळे टडो सरकारने 2022 मध्ये नवीन नियम केले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List