फसवणूक झाली होsss, पत्नीची जेंडर टेस्ट करा; नवऱ्याची कोर्टाला याचना
दिल्ली उच्च न्यायालयात एक खटला चर्चेत आहे. बायकोच्या लिंग परीक्षणासाठी एका नवऱ्याने कोर्टात धाव घेतली आहे. माझी घोर फसवणूक झाली आहे, माझी फसवणूक करून तृतीयपंथीयाशी माझं लग्न लावून देण्यात आलं आहे. आता मला मुलं कशी होतील? माझा वंश कसा वाढेल? असा सवाल या व्यक्तीने कोर्टाला केला. याप्रकरणी तत्काळ आदेश द्यावा अशी विनंती या व्यक्तीने कोर्टाला केली. या प्रकारामुळे मला मानसिक धक्का बसला आहे. माझं हे लग्न अर्धवट आहे. शिवाय ते बेकायदेशीर आहे, असा दावाही व्यक्तीने याचिकेत केला. याप्रकरणी याचिकाकर्त्याचे दोन्ही वकील अभिषेक कुमार चौधरी आणि जितेंद्र कुमार तिवारी यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. या व्यक्तीचा मानसिक छळ झाला आहे. त्याची फसवणूक करण्यात आली आहे. त्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे, असे या वकिलांनी म्हटले. या प्रकरणात कौटुंबिक हिंसा आणि हुंड्य़ाच्या कायद्याचाही आरोप लावण्यात आला.
‘ती’ महिला नाही
जेंडर तपासणी ही वैयक्तिक बाब आहे, पण लग्नाच्या प्रकरणात या दोन्ही गोष्टी नवरा-बायकोच्या अधिकाराला परिणाम करतात, असे याचिकेत म्हटलेय. तृतीयपंथी असलेल्या महिलेला पत्नीच्या पालनपोषण आणि महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विशेष कायद्याच्या अधिकारांतर्गत अधिकार मागण्याचा हक्कच नाही. कारण कायदेशीर भाषेत तिला महिला म्हणता येत नाही, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
खर्च करतो, फक्त तपासणी करा
माझ्या पत्नीची लिंग तपासणी करा. मी त्यासाठी येणारा सर्व खर्च उचलण्यास तयार आहे. गरज पडल्यास मी माझीही वैद्यकीय चाचणी करण्यास तयार आहे, असेही या व्यक्तीने याचिकेत म्हटले. याआधी या व्यक्तीने ट्रायल कोर्टात जाऊन पत्नीची लिंग चाचणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी केली होती, पण ट्रायल कोर्टाने त्याची याचिका रद्द केली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List