लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या 7 शूटर्संना अटक, पंजाबसह विविध राज्यात दिल्ली पोलिसांची कारवाई
लॉरेन्स बिष्णोई टोळीविरोधात केलेल्या कारवाईत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या 7 शूटर्संना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व शूटर्सची अटक पंजाब आणि अन्य राज्यांमधून केली आहे. पोलिसांनी शूटर्सकडून शस्त्रास्त्रे जप्त केली.
लॉरेन्स बिष्णोई टोळीवर याआधी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) कारवाई केली होती. एनआयएने अनमोल बिष्णोईवर 10 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. अनमोल बिष्णोई उर्फ भानू हा लॉरेन्स बिष्णोई भाऊ आहे. पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमध्ये तो आरोपी आहे.
2023 मध्ये तपास यंत्रणेने त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. बनावट पासपोर्टवर तो हिंदुस्थानातून पळून गेला होता. अनमोल बिष्णोई आपली लोकेशन्स बदलत राहतो आणि गेल्या वर्षी केनिया आणि यावर्षी कॅनडामध्ये दिसला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल बिष्णोईवर 18 गुन्हे दाखल आहेत. त्याने जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगली आहे. 7 ऑक्टोबर 2021 रोजी अनमोलची जामिनावर सुटका झाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List