रत्नागिरीत डंपर-दुचाकीच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू, डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
टीआरपी-आदिनाथ नगर रस्त्यावर डंपर आणि दुचाकी यांच्या झालेल्या भीषण अपघातात दोन महावितरण कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले असून डंपर चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे शहरातील साईनगर व प्रशांतनगर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे हा भीषण अपघात झाला असल्याची चर्चा सर्वत्र आहे.
राघो कृष्णा धुरी (68,रा साईनगर रत्नागिरी), मुक्तेश्वर सहदेव ठीक (58, रा प्रशांतनगर, रत्नागिरी) अशी अपघातात मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास टिआरपी-आदिनाथ नगर समोरील रस्त्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार राघो धुरी हे महावितरणचे निवृत्त अधिकारी होते. तर मुक्तेशवर ठिक हे महावितरण येथे कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी धुरी हे दुचाकीसोबत मुक्तेश्वर ठीक यांना घेऊन मारुती मंदिर नाचणे रोडवरिल त्यांच्या महावितरण कार्यालयाकडे येत होते. टीआरपी येथे आले असता समोरुन येणाऱ्या एसटीला त्यांनी बाजू दिली. मात्र रस्त्याच्या कामामुळे खडीवरुन दुचाकीवरील ताबा सुटून दोघे खाली पडले. त्यांच्या दुचाकी एका रस्त्याच्या बाजूला पडली व दोघेही वृद्ध रस्त्यावर आडवे पडले. क्षणात रस्त्यावर पाठोपाठ हातखंबाहून येणाऱ्या डंपर चालक नागेश शंकर कट्टेमणी (वय 32, रा. स्टेट बॅक कॉलनी, मजगाव रोड, रत्नागिरी ) हे डंपर भरधाव वेगाने घेऊन येत असताना त्यांचा डंपर वरिल ताबा सुटला आणि डंपर त्या दोघांच्याही डोक्यावरुन गेला दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघांच्याही नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईक आल्यानंतर रुग्णालयात गर्दी झाली होती. शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा रुग्णालयात रंगली होती. या प्रकरणी नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित डंपर चालकावरिुद भादवी कलम 106 (अ), 125 (अ) (ब), 219 व मोटार वाहन कायदा 184 अन्वेय गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे अमलदार करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List