भिकारी कमावतायत महिना 1 लाख! सर्वेक्षणामध्ये धक्कादायक माहिती उघड
लाखो रुपयांची फी भरून शिक्षण पूर्ण केलं जातं आणि बऱ्याच वेळा तुटपुंज्या पगारात नोकरी करावी लागते. मात्र, कधीही शाळेची पायरी न चढलेल्या आणि नोकरीचा थांगपत्ता नसलेल्या भिकाऱ्यांनी एसीमध्ये बसून काम करणाऱ्या नोकरवर्गाला कमाईच्या बाबतीत मागे सारले आहे. महिना 90 हजार ते 1 लाख रुपये कमावणाऱ्या 5,312 भिकाऱ्यांना लखनऊमधून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये भिकाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे समाज कल्याण विभाग आणि जिल्हा नागरी विकास संस्था यांनी मिळून एक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सर्वेक्षणामध्ये जवळपास 5,312 भिकारी हे नियमीत काम करणाऱ्या कष्टकरी लोकांपेक्षा जास्त कमावत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे यांची वर्गवारी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. गर्भवती आणि लहान मुलांना कडेवर घेऊन भीक मागणारी महिला दिवसाला 3 ते 4 हजार रुपये कमावते. वयस्कर व्यक्ती आणि लहान मुले दिवसाला 900 ते अडीच हजार रुपये कमावतात. या सर्व भिकाऱ्यांकडे महागडे मोबाईल आणि पॅनकार्ड सुद्धा आढळून आले आहे. त्यामुळे सर्व भिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून सर्वांचे एक कार्ड बनवून त्यांना सरकारी योजनेशी जोडले जाणार आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी सौरभ त्रिपाठी यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List