पुण्यात सापडले 138 कोटी रुपयांचं सोनं, पोलिसांकडून तपास सुरू
पुण्यात 138 कोटी रुपयांचे सोनं पोलिसांनी जप्त केले आहे. पुण्यात निवडणुकीदरम्यान नाकाबंदी करण्यात आली होती. एका टेम्पोची पोलिसांनी झडती घेतली तेव्हा हे घबाड सापडलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सातारा रस्त्यावर पुणे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिसांनी एका संशयित टेम्पोची झडती घेतली. तेव्हा या गाडीमध्ये सोन्याचे दागिने सापडले. संपूर्ण सोन्याची किंमत ही 138 कोटी रुपयांच्या घरात आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आयकर विभागाला कळवले आहे. ज्या टेम्पोमध्ये हे सोनं आढळलं आहे तो टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे सोनं कुणाच्या मालकीचे आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List