शिर्डी मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी; विखेंविरोधात राजेंद्र पिपाडा मैदानात
विधानसभा निवडणुकीसाठी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर आज नगर जिल्ह्यामध्ये अनेक उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे भाजपमध्ये बंडखोरी होण्यास सुरुवात झाली असून, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. खासदार नीलेश लंके यांचा पत्नी राणी लंके यांनी शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. नगर जिल्ह्यात आजी-माजी आमदारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून आले.भाजपाचे डॉ. पिपाडा यांनी लगेच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर शिर्डीतून भाजपचे विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे, राहुरीतून माजी मंत्री शिवाजी कर्डिले, शेवगावमधून मोनिका राजळे, तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे, संग्राम जगताप यांनी अकोले व नगर शहर मतदारसंघ यांनी अर्ज दाखल केले. तसेच शिर्डीमधून डॉ. राजेंद्र पिपाडा, तर शेवगावमधून हर्षदा काकडे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, दिलीप खेडकर यांनीही अर्ज भरले आहेत. आजअखेर तीन दिवसांत 454 इच्छुकांनी 810 अर्ज नेले असून, अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या 28 वर पोहोचली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List