मित्रपक्ष नाराज होणार नाहीत, एवढ्या जागा त्यांना सोडणार; संजय राऊत यांनी केले स्पष्ट
महाविकास आघाडीच आता कोणतेही मतभेद नाहीत. आमचे जागावाटप झाले असून सर्व ठरले आहेत. काही जागांवर उमेदवारांची अदलाबदली किंवा काही बद०ल होण्याची शक्यता आहे. सर्व चित्र सोमवारपर्यंत स्पष्ट होईल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच मित्रपक्षही आमच्यासोबत आहेत. कोणताही मित्रपक्ष नाराज होणार नाही, एवढ्या जागा त्यांना सोडण्यात येणार आहेत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
महाविकास विकास आघाडीत सर्व ठरले असून सर्व झाले आहेत. आमचे मित्रपक्ष नाराज होणार नाहीत, एवढ्या जागा त्यांच्यासाठी सोडल्या जातील, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. एखाद्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार असू शकतात. तसेच एखाद्याने इच्छा व्यक्त करणे अयोग्य नाही. मात्र, एका व्यक्तीलाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात येतो. सुधीर साळवी नाराज नाहीत. कोणीही नाराज नसून शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोठेही बंडखोरी होणार नाही, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
वरळी ही महत्त्वाची जागा आहे. तेथे स्वतः शिंदे यांनी उभे राहवे, त्यांच्याकडे उमेदवार नसतील, तर दिल्लीतील आयात करावेत, ही जागा लढवत त्यांनी जिंकून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कधीही दिल्लीत जागा मागण्यासाठी गेलेले नाहीत, असे राऊत यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. शिंदे यांनी अशी विधाने करताना विचार करावा, त्यांनी बुद्धीला ताण देण्याची गरज आहे. दिल्लीची हवा सध्या प्रदूषित आहे. अशा प्रदूषित हवेत तीन चार दिवस असल्याने शिंदे यांची विचारशक्ती प्रदूषित झाली आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List