मुंबईतील धारावीत तणाव, धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भाग तोडण्यास विरोध, बीएससीच्या वाहनांची तोडफोड

मुंबईतील धारावीत तणाव, धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भाग तोडण्यास विरोध, बीएससीच्या वाहनांची तोडफोड

Mumbai dharavi tension: मुंबईतील धारावीत तणाव निर्माण झाला आहे. धारावीत असलेल्या एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरुन वाद सुरु झाला आहे. हा अनधिकृत भाग तोडण्यास विरोध दर्शवत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे धारावीत पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. संतप्त नागरिकांनी मुंबई मनपाच्या वाहनांची तोडफोड केली आहे. वाहनांच्या काचा फोडल्या गेल्या आहेत.

तणावाची परिस्थिती पाहून पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. या प्रकरणी खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, लोकांच्या विरोधामुळे मनपाच्या पथकाने तुर्त कारवाई थांबवली आहे.

पोलिसांकडून चर्चा, तणाव निवळण्यासाठी प्रयत्न

धारावीत संतप्त जमावाकडून गोंधळ सुरु आहे. एका धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भाग तोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पथक शनिवारी सकाळी धारावीत गेले होते. मनपाचे पथक जाताच एका समुदायाने हा अनिधिकृत भाग तोडण्यास विरोध केला. त्या समुदायाचे शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. पोलिसांकडून या समुदायाशी बोलणी सुरु केली आहे. बीएमसीच्या कारवाईला विरोध करत आहे.

रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला

लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. त्यांची समजूत घालून पोलिसांनी रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला केला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस लोकांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक वर्षांपासून या धार्मिक स्थळावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. परंतु हे अनधिकृत बांधकाम तोडण्यास विरोध केला जात आहे.

मुंबईतील धारावीत तणाव

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लाडक्या बहिणींना दमदाटी, भाजप खासदारावर गुन्हा लाडक्या बहिणींना दमदाटी, भाजप खासदारावर गुन्हा
‘लाडकी बहीण’ योजनेतील पंधराशे रुपयांचा लाभ घेणाऱया महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत आढळल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून...
संजीव खन्ना आजपासून नवे सरन्यायाधीश
गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला,जनता त्यांना टकमक टोक दाखवेल! उद्धव ठाकरे यांचा झंझावात
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा! समृद्ध राज्य बनविण्याचा संकल्प
दिल्ली डायरी – नितीशबाबूंना झालेय तरी काय?
महागाई आणि बेरोजगारीवरून प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला धक्के मारून बाहेर काढले; मुंबईत अमित शहा यांच्या पत्रकार परिषदेत राडा
म्हातारा झालो नाही; सरकार घालवूनच स्वस्थ बसणार! – शरद पवार