राष्ट्रसंतांच्या भूमीत योगींची भाषा विष पेरणारी; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

राष्ट्रसंतांच्या भूमीत योगींची भाषा विष पेरणारी; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे आणि ग्रामगीतेतून देशात एकता निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीत ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या विषारी घोषणा देणाऱ्या योगींच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. योगी म्हणजे मुखात राम आणि बगलमध्ये सुरी अशी लक्षणे तर ढोंगी साधूंची असल्याचा पलटवार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. गुरुदेवनगर गुरुकुंज मोझरी येथे यशोमती ठाकूर यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.

विरोधकांचा खरपूस समाचार घेतांना खरगे म्हणाले की, राष्ट्र एकसंघ राहण्यासाठी काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. आरएसएस, भाजपने स्वातंत्र्यासाठी काय केले, देशाचा इतिहास लक्षात घेता काँग्रेसचे योगदान आणि बलिदान दिसून येते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. आम्ही संविधानावर चालणारे लोकं आहोत मात्र विरोधकांची भाषा संविधान तोडणारी मनुस्मृती भाषा आहे.जुमलेबाज मोदी सरकारने ना पंधरा लाख दिले नाही वर्षाला दोन कोटी नोकऱ्या दिल्या,ना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले. याउलट शेतीमालाचे भाव कमी झाले, बेरोजगारी वाढली, देशात अराजकता निर्माण केली.काँग्रेसने संविधान वाचवून लोकशाही जिवंत ठेवल्यामुळे मोदी प्रधानमंत्री झाले असे सांगून खरगे यांनी आज संविधान वाचविण्याची गरज असल्याचे नमूद केले.

संविधान असेल तर देशातील नागरिकांचे हक्क सुरक्षित आहेत त्यामुळे तोडण्याची भाषा करणाऱ्या व मनुस्मृतीवर चालणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्या व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. गुरुकुंज मोझरी येथे झालेल्या जाहीर सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होती. या सभेने विरोधकांचे धाबे दराने अशी चर्चा सभास्थळी होती.

ये शेरनी है,किसिसे डरती नही
महाविकास आघाडीच्या उमेदवार व काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या चवथ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. त्यांनी मतदार संघात विविध योजना आणून सर्वच क्षेत्राचा विकास केला. त्या अतिशय योग्य उमेदवार असून यापुढेही त्या तुमच्या सेवेत राहून उत्तम काम करतील. तुमचा आशीर्वाद देऊन व तुमच्या मतांचा योग्य वापर करून यशोमती ठाकूर यांना निवडून द्या.यशोमती ठाकूर या नुसत्या उमेदवार नाहीत तर त्यांचे काँग्रेस पक्षासाठीही मोठे योगदान आहे. त्यांचे कामच त्यांचा धर्म आहे, लढाऊ महिला म्हणून त्या सर्वश्रुत असतांना ये शेरनी है किसिसे डरती नही असे म्हणत यशोमती ठाकूर यांचे भरभरून कौतुक केले.

नेत्यांनी मर्यादा जपावी
उठसुठ कुणीही काहीही बोलतात, पदाची गरीमा न ठेवता तसेच पक्षाची विचारसरणी झुगारून आज मोदींपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत विषारी भाषेचा वापर करतात. काल, परवा येथील एका मुलीने खासदाराला चपराशी संबोधले.यावरून त्यांच्या संस्काराची प्रचिती येते. बळवंत वानखडे यांना संविधानाने खासदार बनविले. बळवंत वानखडे हे जनतेचे, देशाचे, महापुरुषांचे शिपाई आहेत. उलट असे वक्तव्य करणाऱ्यांनी स्वतः अवलोकन करावे असे बोलल्यानेच आपण एकदा जेलवारी सुद्धा केलेली आहे त्यामुळे आपण भाषेचा योग्य वापर करावा व बोलतांना, काम करतांना आपली मर्यादा जपावी असा इशारा देत मल्लिकार्जुन खरगे यांनी नवनीत राणा यांना मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला.

फडणवीस सरकार खोट्या योजना राबवत आहेत-यशोमती ठाकूर
विद्यमान राज्यसरकारने जनतेची फसवणूक केली आहे. हे केवळ मतांसाठी शासनाच्या तिजोरीचा वापर करत असून फसव्या योजना राबवित आहेत. महिला असुरक्षित असून युवक बेरोजगार झालेत, शेतीमालाला भाव न देता त्यांचीही फसवणूक केली. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतनाचा विषय आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे आणि हे फसनविस सरकार लोकांना जातीपातीच्या राजकारणात अडकवून ठेवत आहे. खोटे आमिषे दाखवून युवकांना फसविण्याचे प्रकार हे सरकार करत आहे अशी टीका करून यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सर्व समस्यांवर निघेल असे उपस्थितांना आश्वासन दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात
राज्य विधानसभा निवडणुकीत मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसंतसे नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे. अजितदादा यांच्या कालच्या स्फोटक मुलाखतीनंतर आता...
दुश्मन एकत्र येतात तर आम्ही का नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ, उद्धव ठाकरे यांना केले मोठे आवाहन
पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं; जुही चावलाची उडवली होती खिल्ली, सत्य जाणून तुम्हीही व्हाल भावूक!
Train Accident – तेलंगणातील पेड्डापल्लीमध्ये रेल्वे अपघात, 11 डबे रुळावरुन घसरले
Sunita Williams Health – माझी तब्येत ठिक…सुनीता विल्यम्सने तब्येतीबाबत दिली माहिती
गुजरातमधील रुग्णालयाचा प्रताप, आयुष्यमान योजनेच्या लाभासाठी 19 जणांची अँजिओप्लास्टी; दोघांचा मृत्यू
Video – उद्धव ठाकरे यांची तोफ धाराशिवमध्ये धडाडली