बाप कशाला तुमचे काकाच ही आश्वासनं पूर्ण करतील, जयंत पाटील यांचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
महाविकास आघाडीने एवढ्या घोषणा दिल्या आहेत, त्यांचा बाप तरी पुर्ण करेल का असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यावर बाप कशाला तुमचा काकाच ही सर्व आश्वासन पूर्ण करतील असे जोरदार प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिले आहे.
नाशिकमध्ये जयंत पाटील यांना गणेश गिते यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. तेव्हा पाटील यांनी महाविकास आघाडीने मतदारांना काय वचनं दिली याची माहिती देत होते. तेव्हा पाटील म्हणाले की सांगलीत अजित पवार म्हणत होते की महाविकास आघाडीने एवढ्या घोषणा दिल्या, एवढी आश्वासनं दिली की ती त्यांच्या बापालाही पूर्ण करता येतील का? तेव्हा जयंत पाटील म्हणाले की, या पाच मागण्या विचार करून आम्ही आणल्या आहेत. महायुतीने हजारो घोषणा केल्या, पण एकही घोषणा धड नाही, सगळ्या भाराभार चिंध्या. अजित पवारांनी बापाचा विषय काढू नये. महाविकास आघाडीची आश्वासनं तुमचे काकाच पूर्ण करतील असे जयंत पाटील म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List