अवैध धंद्यांवर ‘ड्रोन’ स्ट्राईक! प्रयोगातील पहिल्याच दिवशी 67 गुन्हे दाखल
अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे संकल्पनेतून लातूर पोलीसाकडून ड्रोनचा वापर करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग होता. दरम्यान या प्रयोगाअंतर्गत 67 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात लातूर पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे. रविवारी पहाटे मासरेडचे आयोजन करून जिल्ह्यातील गावठी दारू बनविणारे अड्डे हुडकून नष्ट करून अवैध देशी-विदेशी मद्य व गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 7 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टी रसायन नष्ट केला. तसेच 67 व्यक्तिंविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत 67 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अडगळीच्या व दुर्गम भागातील हातभट्टी निर्मिती अड्ड्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसाकडून हायटेक ड्रोनचा वापर करून अडगळीच्या व दुर्गम भागातील हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List