सामना अग्रलेख – हे तर ‘जिहादी’ भाऊ!

सामना अग्रलेख – हे तर ‘जिहादी’ भाऊ!

दहशतवाद्यांच्या तोंडी जी भाषा असते, तीच सध्या राज्यकर्त्यांच्या तोंडी दिसत आहे. त्यातूनच मिंध्यांचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे प्रचार फेरीमध्ये वृद्धाला शिवी हासडत आहेत आणि ‘‘तुला नाही पुरा केला तर नाव नाही सांगणार’’ अशा शब्दांत धमकी देत आहेत, तर कोल्हापुरात भाजपचे खासदार धनंजय महाडिक ‘‘लाडक्या बहिणींनो, विरोधकांच्या रॅलीमध्ये दिसलात तर याद राखा’’ असा दम भरत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या गरजू लाभार्थी माताभगिनींनाव्होट जिहादच्या तागडीत ढकलत आहेत. हे लाडके भाऊ नसून लाडक्या भावाच्या मुखवटय़ाआड दडलेलेजिहादीभाऊ आहेत. त्यांची मानसिकता दहशतवादी आहे.

राज्यातील सत्ताधारी ‘लाडकी बहीण’ योजनेवरून स्वतःला ‘लाडके भाऊ’ वगैरे म्हणवून घेत असतात तर विरोधकांना ‘सावत्र भाऊ’ असे संबोधत असतात. प्रत्यक्षात मात्र राज्यकर्त्यांच्याच मनात माता-भगिनींविषयी दुष्टपणा भरलेला आहे आणि त्याचा प्रत्यय त्यांचीच वाचाळवीर मंडळी आणून देत आहेत. आता भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी अशीच मुक्ताफळे उधळली असून ‘लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या बहिणींना थेट धमकीच दिली आहे. ‘‘लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या बहिणी जर काँग्रेस पक्षाच्या रॅलीत दिसल्या, तर त्यांचे फोटो काढून ठेवा. त्यांची नावे लिहून ठेवा. ती आमच्याकडे द्या. आम्ही त्यांची व्यवस्था करतो,’’ अशा शब्दांत महाडिक महाशयांनी सत्ताधारी ‘लाडक्या भावां’चे खायचे दात कोल्हापुरातील एका सभेत दाखविले. त्यांच्या या वादग्रस्त विधानावर अपेक्षेप्रमाणे प्रचंड टीका झाली. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर ‘पोस्ट’ टाकून माफीनामा सादर केला. मात्र माफीची मखलाशी करताना आपली ही प्रतिक्रिया ‘व्होट जिहाद’ करणाऱ्या महिलांमुळे स्वाभाविकपणे आली, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. माफी मागण्याचे नाटक तर करायचे, परंतु त्याच वेळी ओठातून बाहेर आलेले मनातले विषही नाकारायचे नाही, असाच हा प्रकार आहे. मुळात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना सत्ताधारी पक्षाने

विधानसभा निवडणुका डोळय़ांसमोर

ठेवूनच जाहीर केली. 1500 रुपये घ्या आणि आम्हालाच मते द्या, हीच देवाणघेवाण राज्यकर्त्या मंडळींना लाभार्थी माता-भगिनींकडून अपेक्षित आहे. कुठल्याही बंधुप्रेमापोटी किंवा माता-भगिनींच्या काळजीपोटी ही योजना यांनी सुरू केलेली नाही. त्यांच्यासाठी हा निव्वळ एक ‘व्यवहार’ आहे. ‘‘आम्ही तुम्हाला दरमहा 1500 रुपये देत आहोत ना. मग तुम्ही फक्त आणि फक्त सत्ताधारी पक्षांच्याच रॅली, सभा, प्रचारात सहभागी व्हायचे. सत्तापक्षांनाच मते द्यायची. आमच्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि विरोधी पक्षांचा प्रचार करायचा, त्यांचे झेंडे फडकवायचे, असे कसे चालेल?’’ लाडकी बहीण योजनेमागची सत्ताधारी मंडळींची खरी मानसिकता ही अशी आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी ‘लाभार्थी’ बहिणींना धमकावण्याचे कारण तेच आहे. तुम्ही जर खरंच माता-भगिनींच्या काळजीपोटी ही योजना सुरू केली असेल, तर त्यांना धमक्या का देत आहात? पुन्हा माफी मागताना ‘व्होट जिहाद करणाऱ्या स्त्रियांमुळे आलेली ही स्वाभाविक प्रतिक्रिया’ आहे, असा शिरजोरपणा का करीत आहात? सध्याच्या राज्यकर्त्यांना दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र ‘जिहाद’ या शब्दाचे भलतेच भरते आलेले आहे. ‘लव्ह जिहाद’चे भूत तर ते नेहमीच नाचवीत असतात. आता लोकसभा निवडणुकीपासून ते

‘व्होट जिहाद’चे भूत

नाचवीत आहेत. या निवडणुकीत भाजपवाल्यांना महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात जो जबर तडाखा बसला तेव्हापासून त्यांना लागलेली ‘व्होट जिहाद’ची उचकी थांबायला तयार नाही. लाभार्थी ‘लाडक्या बहिणीं’ना बघून घेऊ असा दम भरणारे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनाही स्त्रियांच्या व्होट जिहादची उचकी लागली, तीदेखील महिलांची माफी मागताना. महाडिक यांचा हा माफीनामा कसा म्हणता येईल? ‘‘लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलात ना. मग मते तर आम्हालाच द्या, विरोधकांच्या प्रचारातही दिसू नका! दिसलात तर तुमची व्यवस्था करू’’ ही ‘लाडक्या भावा’ची भाषा कशी म्हणता येईल? दहशतवाद्यांच्या तोंडी जी भाषा असते, तीच सध्या राज्यकर्त्यांच्या तोंडी दिसत आहे. त्यातूनच मिंध्यांचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे प्रचार फेरीमध्ये वृद्धाला शिवी हासडत आहेत आणि ‘‘तुला नाही पुरा केला तर नाव नाही सांगणार’’ अशा शब्दांत धमकी देत आहेत, तर कोल्हापुरात भाजपचे खासदार धनंजय महाडिक ‘‘लाडक्या बहिणींनो, विरोधकांच्या रॅलीमध्ये दिसलात तर याद राखा’’ असा दम भरत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या गरजू लाभार्थी माता-भगिनींना ‘व्होट जिहाद’च्या तागडीत ढकलत आहेत. हे लाडके भाऊ नसून लाडक्या भावाच्या मुखवटय़ाआड दडलेले ‘जिहादी’ भाऊ आहेत. त्यांची मानसिकता दहशतवादी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपच्या प्रचारसभेत मिथुन चक्रवर्ती यांच्या पाकिटाची चोरी; मंचावरूनच चोराला केलं आवाहन भाजपच्या प्रचारसभेत मिथुन चक्रवर्ती यांच्या पाकिटाची चोरी; मंचावरूनच चोराला केलं आवाहन
महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्येही लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील निरसा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार अपर्णा सेनगुप्ता यांना तिकिट देण्यात...
सचिन तेंडुलकरच्या लेकीचे महागडे शौक; ड्रेस अन् व्हाईट गोल्डचे ब्रेसलेट, किंमत ऐकून अवाक् व्हाल
“मी त्यातून बाहेर पडू शकत नव्हतो कारण..”; कठीण काळाविषयी अर्जुन कपूरने सोडलं मौन
“पोलिसांनी मला तिच्या घराजवळ..”; ऐश्वर्याच्या घराबाहेरील गोंधळानंतर जेव्हा सलमानने केला खुलासा
पथारीवाले धंगेकर यांच्या पाठीशी
स्पा सेंटरमध्ये मसाज करणे बँक कर्मचाऱ्याला महागात पडले, मदतीसाठी पोलिसात धाव
Voter ID Card नाही, चिंता नको; ‘या’ 12 पैकी एक कागदपत्र असले तरी बिनदास्त करा मतदान!