महिलेचा स्तुत्य विक्रम, स्वत:चाच दहा वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला
एका महिलेने आपले स्वत:चे दूध दान करुन विश्व विक्रम बनवला आहे. या महिलेने आतापर्यंत शेकडो मुलांची मदत केली आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनुसार या महिलेने आतापर्यंत 2,645.58 लिटर दूध दान केले आहे.विशेष म्हणजे तिने 1569.79 लीटर दान करणाऱ्या या महिलेने आपलेच दहा वर्षापूर्वीचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे.
ॲलिस ओग्लेट्री (36) असे या महिलेचे नाव असून ती अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहते. महिलेने दान केलेले दूध नॉर्थ टेक्सास येथील मदर्स बॅंकेला दिलेले आहे. खरंतर या महिलेने आकड्यापेक्षा जास्त दान केले आहे. नॉर्थ टेक्सासच्या मदर्स मिल्क बॅकेच्या माहितीनुसार एक लीटर आईटे दूध वेळेपूर्वी दिल्याने 11 मुलांचे पोषण होऊ शकते. अनुमानानुसार, महिलेने आतापर्यंत 3 लाख 50 हजार अधिक नवजात बालकांची मदत केली आहे.
अॅलिस हिच्या म्हणण्यानुसार, माझे मन मोठे आहे. मी काही श्रीमंत नाही त्यामुळे इच्छा असतानाही कोणाला पैसे देऊ शकत नाही. कारण मला आधार देण्यासाठी एक कुटुंब आहे. त्यामुळे दूध दान करणे योग्य वाटले. महिलेने सांगितले की, 2010 पासून मी माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर दूध दान करण्यास सुरुवात केली. मुलगा आता 14 वर्षांचा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List