सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरेंचा पर्दाफाश केला, शरद पवारांना बजावलेली नोटीस माध्यमांना दाखवली

सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरेंचा पर्दाफाश केला, शरद पवारांना बजावलेली नोटीस माध्यमांना दाखवली

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या सभा सुरू असून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये एका प्रचार सभेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरीचे महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्यावर निशाणा साधला होता. पुणे येथील पोर्श कार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नोटीस पाठवली आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती. मात्र यानंतर सुनील टिंगरे यांनी सुप्रिया सुळेंच्या या आरोपाला विरोध केला होता. याच पार्श्वभूमिवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरे यांना याबाबतचा पुरावा प्रसारमाध्यमांसमोर दाखवून प्रकरणाचा खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पोर्श कार प्रकरणातीस नोटीस बाबात नकार देणाऱ्या सुनील टिंगरे यांचा पर्दा फाश केला आहे. सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर सुनील टिंगरे यांनी पाठवलेली नोटीस दाखवली.’सुनिल टिंगरे यांनी सांगितले की मी कोणतीही नोटीस पाठवली नाही. यामुळे या नोटीसची कॉपी मी आणली आहे. यामध्ये शरदचंद्र पवार यांचे नाव आहे. त्यांच्या नावानीशी ही नोटीस पाठली आहे. तसेच त्यात पोर्श कार अपघात प्रकरणात बिनशर्त माफी मागण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ही नोटीस त्यांच्यासाठीच असल्याचं सुप्रिया सुळे यांनी दावा केला.

आता आम्ही कशासाठी माफी मागायची आहे. आमदार टिंगरे स्वत: पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस स्टेशनला गेले होते, आणि हे पोलिसांनी मान्य देखील केले आहे. यासंदर्भात माध्यमांमध्येही बातम्या आल्या आहेत. त्याबाबत ही नोटीस दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आम्ही सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केले तर आमच्यावर ते फौजदारी आणि गुन्हेगारी खटला दाखल करणार आहे. आम्हाला हा गुन्हा मान्य आहे. ही नोटीस 15ऑक्टोबर रोजी पाठवली आहे. यावर अजित पवार पक्षाची सही असून ती 15 ऑक्टोबरला पाठवण्यात आली आहे. पोर्श कार प्रकरणातील नोटीसचा पुरावा देत सुप्रिया सुळे हल्लाबोल केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का? भाजपा आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का? भाजपा आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ
राज्यात निवडणुकीला रंग चढला आहे. प्रचाराच्या तोफा आता थोड्याच दिवसात थंडावतील. त्यापूर्वी आमदार, नेते आणि कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रचार करत...
निवडणुकीच्या धामधुमीत कॉमनमॅनच्या भावनांना साजेसं रॅप साँग; तरुणांकडून भरभरून प्रतिसाद
‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजेवर संकट; लीला यातून कसा काढणार मार्ग?
“ब्रेकअपनंतर सिंघम अगेनच्या सेटवर अर्जुनची अवस्था…”; रोहित शेट्टीकडून खुलासा
“त्यांना गमावल्यानंतर..”; वडिलांच्या आत्महत्येबद्दल पहिल्यांदाच मलायका अरोरा व्यक्त
मतदान करणाऱ्यास पेट्रोल फ्री मिळणार
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ, व्हीव्हीआयपी रांगेत तरुणाची घोषणाबाजी; सुरक्षारक्षकांची धावपळ