गुंडगिरीची भाषा अन् दहशत पसरवणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा; धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावर सतेज पाटील यांचा हल्लाबोल

गुंडगिरीची भाषा अन् दहशत पसरवणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा; धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावर सतेज पाटील यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पंधराशे रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत आढळल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं, असं नाही चालणार. आज महाराष्ट्रात अनेक तांया (ताई) छाती बडवून सांगत आहेत की, आम्हाला पैसे नकोत. सुरक्षा पाहिजे. पैसे नकोत, राजकारण करताय यांचे ? काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या तर फोटो काढून घ्या त्यांचे, काँग्रेसच्या रॅलीला महिला दिसल्या जाऊन त्यांचे फोटो काढायचे आणि आमच्याकडे पाठवा आम्ही व्यवस्था करतो, अशा शब्दांत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्याचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सडकून टीका केली आहे. तर माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल, तर त्यांची माफी मागतो, अशी सारवासारव महाडिक यांनी केली आहे.

गुंडगिरीची भाषा अन या भाषेतून दहशत पसरवणे हा एकमेव अजेंडा या महाडिक कंपनीचा राहिला आहे. परंतु कोल्हापूरची जनता हुशार आहे. असल्या धमकीला आमच्या माता भगिनी घाबरणार नाहीत. घरातले पैसे दिल्यासारखे ते बोलत आहेत. छाती बडवून घ्या असे ते म्हणाले, म्हणजे यांना सुरक्षित महिला नको आहेत. यांच्या मनात महिलांना सुरक्षा द्यायची नाही. त्यांच्या या वक्त्याचा राज्यातील काँग्रेस निषेध करत आहे, असे सतेज पाटील म्हणाले.

राज्यात सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रमुख मुद्दा बनविण्यात आला आहे. जाहीरनाम्यात ही महायुती सरकार निवडून आल्यानंतर दरमहा पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर महाविकास आघाडी कडूनही लाडक्या बहिणीसाठी तीन हजार रुपये देण्याची घोषणा वचननाम्यात करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला असतानाच, या योजनेवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये अहंकार पसरल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी सायंकाळी फुलेवाडी येथे आयोजित केलेल्या जाहिर प्रचार सभेत बोलताना भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महिलांच्या बाबत अत्यंत वादग्रस्त व धमकी देणारे विधान करण्यात आले आहे. एवढेच बोलून न थांबता धनंजय महाडिक यांनी त्यापुढे जाऊनही आणखी धक्कादायक विधान केले. जर मोठ्याने कोण भाषण करायला लागली. दारात आली तर तिला एक फॉर्म द्यायचा. खाली सही कर म्हणायचे. लगेच उद्या पैसे बंद करतो म्हणायचे. आमच्याकडे काय लय पैसे झालेले नाहीत, असे वक्तव्यही त्यांनी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या राज्यात विरोधकांच्या सुनेलाही साडी चोळी देऊन परत पाठवण्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेला आहे. धनंजय महाडिक हे भाजपचे खासदार आहेत. त्यांनी उत्तरच्या पोटनिवडणुकीतही जयश्री जाधव यांचा अपमान केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी असे वक्तव्य केले आहे. महाडिक यांची पार्श्वभूमी कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे. गुंडगिरीची भाषा अन या भाषेतून दहशत पसरवणे हा एकमेव अजेंडा या महाडिक कंपनीचा राहिला आहे. परंतु कोल्हापूरची जनता हुशार आहे. असल्या धमकीला आमच्या माता भगिनी घाबरणार नाहीत. घरातले पैसे दिल्यागत ते बोलत आहेत. छाती बडवून घ्या असे ते म्हणाले, म्हणजे यांना सुरक्षित महिला नको आहेत. यांच्या मनात महिलांना सुरक्षा द्यायची नाही. त्यांच्या या वक्त्याचा राज्यातील काँग्रेस निषेध करत आहे. महाडिक परजिल्ह्यातील आहेत त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकर व ताराराणीचा वारसा ते सांगू शकत नाहीत. त्यांना या मातीचा नेमका काय गुण आहे हे माहीत नाही. त्यांच्या या वक्त्याचा जाहीर निषेध करतो.
– सतेज पाटील, काँग्रेस नेते

माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना, विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना, लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकार मुळेच यशस्वी झाली असल्याचे ठाम पणे नमूद करताना, चुकून आलेली प्रतिक्रिया आहे. मी माझ्या वैयक्तिक , राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नी मार्फत गेली 16 वर्षे भागीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच सकारात्मक काम करत आलो आहे आणि यापुढेही करत राहीन. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण बाबत आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. तरीही माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाईच्या चरणी मी प्रार्थना करतो.
– धनंजय महाडिक,भाजप खासदार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का? भाजपा आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का? भाजपा आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ
राज्यात निवडणुकीला रंग चढला आहे. प्रचाराच्या तोफा आता थोड्याच दिवसात थंडावतील. त्यापूर्वी आमदार, नेते आणि कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रचार करत...
निवडणुकीच्या धामधुमीत कॉमनमॅनच्या भावनांना साजेसं रॅप साँग; तरुणांकडून भरभरून प्रतिसाद
‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजेवर संकट; लीला यातून कसा काढणार मार्ग?
“ब्रेकअपनंतर सिंघम अगेनच्या सेटवर अर्जुनची अवस्था…”; रोहित शेट्टीकडून खुलासा
“त्यांना गमावल्यानंतर..”; वडिलांच्या आत्महत्येबद्दल पहिल्यांदाच मलायका अरोरा व्यक्त
मतदान करणाऱ्यास पेट्रोल फ्री मिळणार
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ, व्हीव्हीआयपी रांगेत तरुणाची घोषणाबाजी; सुरक्षारक्षकांची धावपळ