महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या मंडणगड शहरातील निवडणूक प्रचार फेरीला उस्फूर्त प्रतिसाद
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंडणगड शहरात निघालेल्या प्रचार फेरीला मंडणगड शहरातील नागरिकांच्या उपस्थितीचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवार चांगलेच धास्तावले आहेत.
263 दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम हे महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना दापोली विधानसभा मतदार संघातील गावात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावा गावातील उस्फूर्त प्रतिसादानंतर त्यांनी आपला मोर्चा आता मोठ्या लोकवस्तीच्या गावांबरोबरच शहराकडे वळविला आहे. त्यानुसार त्यांनी मंडणगड शहरात निवडणूक प्रचाराची फेरी काढली. या निवडणूक प्रचार फेरीला मंडणगड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याने महाविकास आघाडी विरोधी उमेदवार मात्र निवडणूक प्रचार फेरीला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाने चांगलेच धास्तावले आहेत.
मंडणगड शहरातील निवडणूक प्रचार फेरीत खेड येथील प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद ऊर्फ अप्पा कदम हे सहभागी झाल्याने निवडणूक प्रचार फेरीची आणखीनच रंगत वाढली. उद्योजक सदानंद कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांना शिर्डीच्या श्री. साईबाबांची तसबीर भेट देत निवडणूकी आधीच निवडणुकीतील विजयाचा पेढा भरवला त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले.
महाविकास आघाडीकडून मंडणगड शहरातून काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या निवडणूक प्रचार फेरीत स्व:ता उमेदवार संजय कदम, प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि मंडणगड तालूका प्रमुख संतोष गोवले, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुस्ताक मिरकर , शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुभाष सापटे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकर कांगणे , सायली कदम, शिवसेना महिला आघाडी उप जिल्हा संघटिका मानसी विचारे खेडचे गौस खतीब, दशरथ सापटे आदी महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List