त्यांनी गुवाहाटीतील डोंगर पाहिला, आता जनता त्यांना टकमक टोक दाखवेल; उद्धव ठाकरे कडाडले
सांगोले येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार दिपकआबा बापूसाहेब साळुंखे प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी सभा घेतली. या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. या सभेत उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली. ते फक्त आश्वासने देतात, प्रत्यक्षात काही मिळत नाही. मात्र आपण वचन पाळणारे आहोत. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणारच, असे वचन उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिले.
जनता आता दिपकआबा यांना विधानसभेत येणार आहे, हे जनतेने ठरवले आहे. रेल्वेत कोणाची ओळख असेल तर 23 तारखेचे गुवाहाटीचे एक तिकीट हवे आहे. त्यांना जाऊ द्या गुवाहाटीला काय झाडी, काय डोंगुर बघायला, दिपकआबांना तुम्ही विधानसभेत पठवा, असे सांगत त्यांनी कोणाचेही नाव न घेता जबरदस्त टोला लगावला. प्रत्येकाचे नशीब असते. देव संधी देत असतो, त्या संधीचे सोने करायचे की माती करायची, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. गेल्यावेळी एका गद्दाराला आपण संधी दिली, तुम्ही त्याला निवडून दिले. त्याने त्या संधीचे नाही, तर आयुष्याचे मातेरे केले. किती माज असतो एखाद्याला, लय म्हणजे एकमदच लय…तुम्ही त्यांना मोठे केले होते. त्यांना माहिती नाही, हे मोठे करणारेच त्यांचा माज उतरवू शकतात. आपण त्यांचा माज उतरवायाला आलो आहोत. मी आलोय ते गद्दारांना गाडायला आलो आहे, मी आलोय ते गद्दारांच्य छाताडावर भगवा रोवायला आलो, असा निर्धारही उद्धाव ठाकरे यांनी व्यक्त केला.
गद्दारांना काय वाटते, ते गद्दार म्हणजे सगळी जनता गद्दार. पण असे नाही. त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही. महाराष्ट्र गद्दारांना कधीही माफ करत नाही. त्यांनी तिथला डोंगुर पाहिला पण रायगडाचे टकमक टोक पाहिले नाही. ते जनता त्यांना 23 तारखेला दाखवणार आहे. जनता 23 तारखेला त्यांचा राजकीय कडेलोट करणार आहे आणि त्यांची मस्ती, माज उतरवणार आहे. आपण त्यांना काय दिले नव्हते, सर्वकाही दिले होते. आपण गेल्यावेळीच दिपकआबांना उमेदवारी देणार होतो. मात्र अचानक मध्येच धरण फोडणारा खेकडा घुसला. तो म्हणाला ही नक्की निवडून येणार, त्यावेळी आपण दिपकआबांना थांबण्याची विनंती केली होती. ती त्यांनी मान्य केली आणि आपल्या उमेदवाराला विजयी केले. अशी निष्ठा पाहिजे. आता त्यांच्या मार्गातील स्पीडब्रेकर आपण सपाट केले आहे. एक ढेकूळ आहे, त्यालाही आता सपाट करायचे आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
आता आमची मशाल पेटली आहे, धगधगते आहे. जनता आता निवडणुकीची वाट बघत आहे. त्यांच्या बुडाला आता आग लागत आहे. गद्दारीचा वार त्यांनी उद्धव ठाकरे, शिवसेनेवर नाही केला. तर आई असलेल्या महाराष्ट्रच्या कुशीवर वार केला आहे. आता मोदी-शहा मुन्नाभाई सर्किटसारखे फिरत आहे. क्या भाई किसको उठानेका, क्या करनेका असे करत वणवण करत महाराष्ट्रात फिरत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
370 कलम काढले आणि शेतमालाला भाव मिळत नाही. त्यांना कदाचित स्मृतिभ्रंश झाला असेल. 370 कलम हटवण्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. याचा त्यांना विसर पडला आहे. हिंदुहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अडचणीत असलेल्या कश्मिरी पंडितांना महाराष्ट्रात आसरा दिला होता. 370 कलम हटवल्यानंतर मोदी शहा यांनी किती पंडितांना करत कश्मिरात नेले आहे, ते सांगा, असे आव्हानही त्यांनी दिले.
शेतकरी हमीभाव मागत आहे, त्यांना सांगता 370 हटवले. तरुण रोजगार मागत आहेत, त्यांना सांगता राममंदिर बांधले. राम मंदिर उभारणीसाठी आम्ही त्यांच्यासोबत होतो. मुख्यमंत्री होण्याआधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांसोबत आपण अयोध्येला गेलो होतो. जनतेत संभ्रम निर्माण करत हिंदू मुस्लीम वाद निर्माण करायचा. जनतेचे भान हरपते आणि आपण त्यांना डोक्यावर घेतो. इथल्या मूलभूत समस्यांबाबत ते का बोलत नाही, असा परखड सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
आज मुंबई कोणाच्या घशात घालण्यात येत आहे. मुंबई ही आम्हाला आंदण मिळाली नव्हती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने आपण हक्काने मिळवली होती, रक्त सांडून, बलिदान देत, आंदोलन करून ती संघर्षाने आपण मिळवली होती. आपण संघर्ष करून मिळवलेली मुंबई हे अदानीच्या घशात घालत असतील तर यांचे राज्य परत आल्यावर तुमच्या सातबारावर ते अदानीचे नाव लावू शकतात. त्यामुळे ही कीड जागच्याजागी ठेचण्याची गरज आहे. आपले सरकार आल्यावर अदानीच्या घशात घातलेली जमीन बाहेर काढणार, अदानीला दिलेल्या सोयीसुविधा, सवलती रद्द करणार. तसेच मुंबई आपल्या हक्काची आहे. अदानीचा हक्क नाही. त्याला दिलेली जमीन काढणार आणि मुंबईतील नागरिकांना मुंबईतच परवडणारे घर देणार आहे, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले.
पश्चिम महाराष्ट्र सहकाराचा पट्टा आहे. येथे साखर कारखाने, सहकारी बँका, उद्योग आहेत. सहकार हा राज्याचा विषय आहे. मात्र, केंद्रात सहकार खाते तयार केले आणि अमित शहांनी हे खाते स्वतःकडे ठेवले आहे. आज अनेक नेते दिल्लीला धाव घेत आहेत. पण वापरा आणि फेकून द्या, ही भाजपची नीती आहे. आता त्यांनी ठरवले आहे की, देवेंद्र फडणवीस त्यांचे पुढचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मिंधेना आता भांडी घासावी लागणार आहेत. तर या डोंगुरवाल्याला मिंधेला भांडी घायायला माती द्यायला सांगा. आता त्यांचा उपयोग संपला आहे. उद्या अमित शहा सहकार क्षेत्र गिळायला बसले आहेत. सहकारी बँका ते अदानीच्या घशा घालणार नाहीत हे कशावरून, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
बटेंगे तो कटेंग असा नारा ते देत आहे. पण हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तोमें बाटेंगे असा त्यांचा अर्थ आहे. ते मन की बात करतात आपण जन की बात करतो, मिंधे धनकी बा करतात, आण्ही जन की बात करत आहोत. महाविकास आघाडीचे एकचआणि एकच उमेदवार आहेत ते म्हणजे दीपक आबा. बंडखोरांनी महाविकास आघाडीला अपशकून करू नये, महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. महाराष्ट्राचे शाप त्यांना लागतील. राज्याच्या पायावर धोंडा पाडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
त्यांचे बूट चाटणारा, त्यांच्यासमोर शेपूट हलवणार माणूस हवा होता. त्यामुळे त्यांनी शिवसेना फोडून कणा नसलेला माणूस खर्चीवर बसवला. आपण महाराष्ट्र लुटू देणार नाही. ही निवडणूक महत्त्वाची आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा राहणार की मोदी-शहा-अदानी यांचा होणार ही ठरवणारी ही निवडणूक आहे. लाथ मारायचा प्रयत्न केला तर तंगड्या तोडून हातात देऊ, हा बाळासाहेबांचा विचार आहे. त्यामुळेच भाजपची साथ सोडली, असेही त्यांनी सांगितले.
देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री राज्यात प्रचार करत होते. त्यावेळी 31 महिलेवर बलात्कार करत तिला जिंवत जाळण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. अत्याचार झालेली महिला त्यांची लाडकी बहीण नव्हती काय, मणीपुरातही यांचे सरकार आहे. तिथे यांना डोळे वटारता येत नाही. निल्लज्जपणाचा हा कळस आहे. मोदी यांनी पंतप्रधानपद आणि शहा यांनी गृहमंत्रीपद सोडावे. पक्षाचे पूर्णवेळ प्रचारक व्हावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. देशात अशी घटना घडत असताना ते प्रचारात गुंतले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आपले सरकार आल्यावर आपण ही परिस्थिती बदलणार आहोत. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहोत. बेरोजागार युवकांना चार हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. महिलांना 3 हजार रुपये देण्यात येणार आहे. मुलींप्रमाणेच मुलांनांही मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. मोदी आताही पंडित नेहरूंनी काय चुका केल्या, ते सांगत आहे. मात्र, 10 वर्षात यांनी काय केले, ते सांगत नाही. त्यामुळे आता दिपकआबा यांना विधानसभेत पाठवण्याचे वचन द्या, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List