अजितदादांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, पोलीस, अन् अधिकाऱ्यांना घेतला चावा

अजितदादांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, पोलीस, अन् अधिकाऱ्यांना घेतला चावा

मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतला, या घटनेत ते जखमी झाले आहेत. अजित पवार हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे.  कसबा गावातील सरदेसाई वाड्याची पाहणी करताना संगम मंदिर परिसरात ही घटना घडली. अचानक मधमाशांनी हल्ला केल्यामुळे ताफ्यातील अनेकांची चांगलीच धावपळ उडाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित गाडीमध्ये बसवण्यात आलं.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कसबा गावातील सरदेसाई वाड्याची पाहणी करताना संगम मंदिर परिसरात ही घटना घडली. अचानक मधमाशांनी हल्ला केला. अजित पवार यांच्या ताफ्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना या मधमाशांनी चावा घेतला. त्यामुळे एकच धावपळ उडाली, अजित पवार यांना सुरक्षित गाडीमध्ये बसवण्यात आलं.

चांगलीच धावपळ उडाली

दरम्यान सरदेसाई वाड्याची पाहणी करताना मधमाशांनी हल्ला केला, मधमाशांचा अचानक हल्ला झाल्यामुळे अजित पवार यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली, मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावासाठी कर्मचाऱ्यांना चांगलंच पाळवं लागलं, काही जणांनी आपल्या हातमधील उपरण्यांनी मधमाशांना दूर हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील यातील काही कर्मचाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतलाच.

रत्नागिरीमधील सावर्डे येथे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अर्थसंकल्पात मी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.  महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करत असतात, मात्र ही योजना सुरूच राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे, ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशांकरता ही योजना आहे, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहलगाम हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णींचं धाडसी पाऊल; शत्रूला मोठी चपराक पहलगाम हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णींचं धाडसी पाऊल; शत्रूला मोठी चपराक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर टूर्सच्या बुकिंग एकामागोमाग एक रद्द होत असताना, काश्मीरला भेट द्यायला पर्यटक घाबरत असताना अभिनेते अतुल कुलकर्णी...
शेजाऱ्याच्या अंडरगारमेंटमध्ये गुपचूप ही वस्तू टाकायचे… परेश रावल यांच्या या खोडी माहिती आहेत का?
कश्मीर खोऱ्यातील गावात दहशतवादाचा काळाकभिन्न अंधार…
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, एलओसीवर पुन्हा गोळीबार; हिंदुस्थानी लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानच्या तुरुंगातील 193 हिंदुस्थानी मच्छीमारांचे काय होणार? महाराष्ट्रातील 18 जणांचा समावेश, केंद्र सरकारला आर्जव
एनआयएच्या हाती महत्त्वाचे पुरावे; दहशतवाद्यांची उलटी गिनती सुरू ,कोम्बिंग ऑपरेश सुरूच, 500 ठिकाणी धाडी
पालिका जपणार विद्यार्थ्यांचे वाचनप्रेम; प्रत्येक वॉर्डमध्ये सुरू होणार सुट्टीतले वाचनालय