आता तर केवळ सुरुवात…अजून किती तापणार? 2025 मध्ये मोडणार उष्णतेचा रेकॉर्ड?
सध्या देशातील काही भागात सूर्य आग ओकतोय. या भागात तापमान आताच 40 अंशांच्या पुढे गेले आहे. अजून तर मे महिना जायचा आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे सर्वात उष्ण ठरणार का? असा सवाल विचारला जात आहे. गेल्यावर्षापेक्षा यंदा जास्त ऊन पडलं तर काय होईल, याची भीती नागरिकांना सतावत आहे. देशात 1901 नंतर वर्ष 2024 मध्ये उष्णतेने नवनवीन रेकॉर्ड केले होते. यंदा तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच भीषण उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा 2025 हे सर्वात हॉट ठरेल का? याची चर्चा होत आहे.
एप्रिल ते जून महिन्यात काय होणार?
उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक शहरात सध्या अशीच स्थिती आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात पाऱ्याने डोळे वटारले आहेत. भीषण गर्मी आणि दमट वातावरणामुळे अनेक भागात उकाडा असह्य झाला आहे. घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे एप्रिलनंतर मे आणि जून हे सर्वाधिक उष्ण महिने असतील का, असा सवाल विचारला जात आहे. पण मध्यंतरी हवामानात बदल झाल्याचे दिसले. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पारा खाली आला.
उष्माघाताचा धोका
विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यातल पारा 40 अंकांचा काटा पार कडून पुढे सरकला आहे. तर मुंबईत पारा 35 अंशांच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे उन्हात फिरता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताचा एक बळी गेला आहे. त्यामुळे दुपारी उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा
ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने तलाव, धरणातील पाणी साठ्याचे बाष्पीभवन झाले आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. विहिरी, कूप नलिका कोरड्या पडल्या आहेत. तर नदी नाले तर कधीच कोरडेठाक पडले आहेत. शेतीच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. अनेक भागात टँकरच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List