एल्फिन्स्टन पुल बंद करण्यावरुन रणसंग्राम, स्थानिक आणि पोलीस आमने-सामने

एल्फिन्स्टन पुल बंद करण्यावरुन रणसंग्राम, स्थानिक आणि पोलीस आमने-सामने

एल्फिन्स्टन ब्रिज बंद करण्यावरुन परळ-प्रभादेवी परिसरातील नागरिक एकवटले आहेत. येथील रहिवाशांना आमचे आधी पुनर्वसन करा आणि नंतर आम्हाला येथे हलवा अशी मागणी करीत शुक्रवारी रात्री आंदोलन केले आहे. शुक्रवार पासून हा ब्रिज वाहतूकीसाठी बंद केलेला आहे त्यामुळे रहिवाशी संतप्त झाले आहेत. पोलीसांना पुल बंद केल्याने रहिवाशांनी आंंदोलन केले आहे.

शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतूला –  वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी वरळी कनेक्टरचे काम लवकरच सुरु होणार आहे. .यासाठी येथे डबल डेकर ब्रिज बांधण्यात येणार आहे.  मात्र येथे पिलर उभारण्यासाठी एलफिन्स्टन रोड येथील इमारतींना रिकाम्या करण्याचे आदेश एमआरआयडीसीने दिले आहेत.  येथे नवा रेल्वे पुल उभारण्यासाठी आणि जुना एल्फिन्स्टन ब्रिज पाडण्यासाठी एल्फिन्स्टन पुल शुक्रवारपासून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांनी येथे पुल बंद करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुनर्वसन याच भागात करा –

या भागातील एल्फिन्स्टन रोड पुलाला शुक्रवार पासून बंद करुन हा ब्रिज तोडण्यास सुरुवात आज पासून होणार होते. त्यानंतर या विभागातील १९ इमारतींना नोटीस दिली आहे. या विभागातील इमारतील तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विभागातील नागरिकांनी ठिय्या मांडत रस्त्यात बसले आहेत. याच भागात पुनर्वसन करावे अशी रहिवाशांची मागणी आहे. परंतू येथे ब्रिजचे पाडकाम करण्यासाठी जेसीपी घेऊन पोहचलेल्या अधिकाऱ्यांना रहिवाशांनी रोखले आहे. गेल्या दीड तासांपासून रहिवाशांचे आंदोलन सुरु आहे.

change the parking directions of Keluskar Road South and Keluskar Road North, adjacent to Chhatrapati Shivaji Maharaj Maidan (Shivaji Park Maidan)

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एल्फिन्स्टन ब्रीजच्या तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती, नागरिकांकडून आंदोलन मागे एल्फिन्स्टन ब्रीजच्या तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती, नागरिकांकडून आंदोलन मागे
मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीजच्या तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी दिली आहे. तोडकामाला...
लतादीदींचे तैलचित्र अंधारात!
पाकिस्तानींना शोधून हद्दपार करा,  अमित शहा यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना फोनवर सूचना;  पाकिस्तानातील हिंदुस्थानींना मायदेशी परतण्याचे आवाहन
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली 30 वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची कबुली
…अन् तिची राष्ट्रीय निवडीतून माघार
दहशतवाद्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, लष्करप्रमुख आणि राज्यपालांनी बैठकीत घेतला सुरक्षेचा आढावा
आयपीएल राऊंडअप – …तर इशानला मैदान सोडावे लागले नसते