Photo – आज जागतिक पेंग्वीन दिनी पर्यटकांना मुंबईत पेंग्वीन दर्शन
जागतिक स्तरावर पेंग्विन पक्षांच्या संवर्धनाबद्दल तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे याच उद्देश्याने दरवर्षी 25 एप्रिल रोजी जागतिक पेंग्विन दिन साजरा केला जातो , भारतात प्रथमच मुंबई महानगर पालिकेच्या भायखळा येथील वीर जिजामाता प्राणी आणि पक्षी संग्रहालयातील ” हम्बोल्ट पेंग्विन ” कक्षात जुलै 2016 ह्या महिन्यात अंटार्क्टिका येथून पाच नर पेंग्विन आणि तीन मादी पेंग्विन भारतात दाखल झाले होते तसेच पेंग्विन पाहण्यासाठी तब्बल एक वर्षाने नागरिकांसाठी जुलै 2017 ह्या महिन्यात कक्ष खुले करण्यात आले होते ,आज पेंग्विनची संख्या 18 वर गेली असून त्यात नऊ नर आणि नऊ मादी अर्थात 10 पेंग्विनची गेल्या आठ वर्षात वाढ झाली आहे . पेंग्विन कक्षात 24 तास सेवा तसेच देखभालीसाठी 4 डॉक्टर्स तसेच 4 केयर टेकर्सची टीम तैनात असते .
( सर्व फोटो : संदीप पागडे )
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List