भाजपच्या माजी नगरसेवकाकडून भ्रष्टाचार, व्यायामशाळेच्या नावाखाली डल्ला; काँग्रेसच्या सागर धाडवे यांचा आरोप
महापालिकेच्या व्यायामशाळेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 29 मध्ये सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक माजी नगरसेवकाने पालिका प्रशासनाच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते सागर धाडवे यांनी केला आहे.
या संदर्भात सागर धाडवे यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली असता, त्यामध्ये महापालिकेने प्रभाग क्रमांक 29 मध्ये तरुणांच्या आरोग्यासाठी कै. भानुदास गेजगे व्यायामशाळा सानेगुरुजी नगर व लोकमान्यनगर व्यायामशाळा, तसेच कै. चंद्रकांत बोत्रे व्यायामशाळा मनपा शाळा क्रमांक 17, नवी पेठ या तीन व्यायामशाळा बांधल्या आहेत. या व्यायामशाळा बांधण्यासाठी तसेच साहित्य खरेदी आणि त्या जिमच्या देखभाल दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा खर्च टेंडरच्या माध्यमातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीदेखील धाडवे यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली आहे.
सागर धाडवे म्हणाले, सदर व्यायामशाळा या महापालिकेच्या मालकीच्या आहेत. मात्र, या माध्यमातून पालिकेला एक रुपयाचेही उत्पन्न मिळाले नसल्याचे पालिकेच्या क्रीडा विभागाने कळविले आहे. तसेच व्यायामशाळा बांधल्यानंतर त्या आजपर्यंत आमच्या ताब्यातही दिल्या गेल्या नाहीत, असे कळविले. याउलट पालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या या तीनही व्यायामशाळांमधून गेली अनेक वर्षे पुणे मनपाचे सत्ताधारी स्थानिक नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते हे एका तरुणांकडून 400 रुपये प्रतिमहिना याप्रमाणे तिन्ही व्यायामशाळांमधून हजारो तरुणांकडून लाखो रुपये गोळा करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List