सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन, हजारो पर्यटक अडकले
सिक्कीममध्ये मूसळधार पाऊस आणि भूस्खलन झाले आहे. त्यामुळे तिथे हजारो पर्यटक अडकले आहेत. सिक्कीमच्या लाचेन-चूंगथांग मार्ग आणि लाचून-चूंगथांग मार्गावरील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्त्यांवर ढिगारे साचले आहेत. जोरदार पावसामुळे हा ढिगाराही हटवता येत नाहीये. सिक्कीममध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बचावकार्य करण्यास अडथळा येत आहे. सिक्कीममध्ये येणाऱ्य़ा पर्यटकांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे.
Sikkim: Heavy rainfall in North Sikkim’s Mangan district caused landslides and road flooding, turning roads into rivers. Tourist vehicles were trapped during peak season. The Sikkim government began rescue operations to evacuate stranded tourists and restore normalcy in the… pic.twitter.com/xnRazZgPcK
— IANS (@ians_india) April 25, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List