रेल्वेचा दोन दिवस जम्बो मेगाब्लॉक, 344 लोकल सेवा रद्द, प्रवाशांची रात्र स्टेशनवर

रेल्वेचा दोन दिवस जम्बो मेगाब्लॉक, 344 लोकल सेवा रद्द, प्रवाशांची रात्र स्टेशनवर

Railway Mega Block: पश्चिम रेल्वेने दोन दिवस जम्बो मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे ३४४ लोकल सेवा रद्द झाल्या. त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना बसला आहे. शुक्रवार रात्रीपासून सुरु झालेल्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना रात्र स्टेशनवर काढावी लागली. तसेच सकाळी रेल्वे स्थानकावर आलेल्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. मेगा ब्लॉकमुळे अंधेरी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली.

का घेतला मेगा ब्लॉक

पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) हे दोन दिवस मेगा ब्लॉक घेतला आहे. माहिम ते बांद्रा स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे शुक्रवार (११ एप्रिल) अप डाऊन धिम्या मार्गावर रात्री ११:०० ते सकाळी ८:३० पर्यंत गाड्या धावल्या नाहीत. अप डाऊन जलद मार्गावर रात्री १२:३० ते सकाळी ६:३० पर्यंत लोकल सेवा बंद होती. यावेळी चर्चगेट स्थानकातून रात्री १०:२३ सुटणाऱ्या सर्व डाऊन लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

शनिवारी (१२ एप्रिल) रोजी रेल्वेचा मेगा ब्लॉक होता. अप डाऊन धिम्या मार्गावर रात्री ११:३० ते सकाळी ९:०० वाजेपर्यंत लोकल सेवा बंद होती. त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालयांमध्ये पोहचणे अवघड झाले. अप जलद मार्गावर रात्री ११:३० ते सकाळी ८:०० वाजपर्यंत लोकल सेवा बंद होती. या काळात चर्चगेट दादर दरम्यान जलद लोकल बंद होत्या. तसेच डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरीवलीहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंतच धावणार आहेत.

विरारवरुन फक्त अंधेरीपर्यंत लोकल

विरारवरुन सकाळच्या वेळेत सर्वच लोकल अंधेरीपर्यंत सोडण्यात आल्या. अंधेरीच्या पुढे मेगाब्लॉक सुरू असल्याने सर्व लोकल बंद होत्या. या मेगाब्लॉकचा प्रवाशांना फटका बसला. अनेक प्रवाशांना रात्री दादर स्थानकावर झोपून काढावी लागली. रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोणतीही सुविधा दिली नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत होता. रात्री आलेल्या प्रवाशांना जेवण मिळाले नसल्याने प्लॅटफॉर्मवर उपाशीच झोपावे लागले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बिलिंगसाठी कर्मचारी नसल्याने मृतदेह आठ तास रुग्णालयातच बिलिंगसाठी कर्मचारी नसल्याने मृतदेह आठ तास रुग्णालयातच
रुग्णाच्या नातेवाईकांनी बिल न अदा केल्याने मृतदेह अडवून ठेवण्याच्या घटना आजवर अनेक रुग्णालयांत घडल्या आहेत; मात्र बिल भरण्यास तयार असूनही...
जम्मू–कश्मीरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन घराघरांत दहशतवाद्यांचा शोध सुरू, त्राल येथे दहशतवादी आसिफ शेखचे घर बॉम्बस्फोटात उडाले
संतापजनक; मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केंद्र सरकारने ठरवला ‘अडथळा’!
एकत्र येऊन लढूया! राहुल गांधी यांनी पहलगाममध्ये घेतली जखमींची भेट
Pahalgam Terror Attack – सब बरबाद हो गया!
आधी पुनर्वसनाची हमी द्या, नंतरच एलफिन्स्टन ब्रीज तोडा, हक्काच्या घरासाठी प्रभादेवीचे रहिवासी
उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांच्या सवलती काढून घेणार