उन्हाळ्यात मधुमेही रुग्ण उसाचा रस पिऊ शकतात का? तज्ञ काय सांगतात ?
उन्हाळ्यात उसाचा रस सर्वांनाच प्यायला खुप आवडतो, कारण उसाचा रस हा एक असा रस आहे जो आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतो. त्याच बरोबर आपल्याला ताजेतवाने देखील ठेवतो. तसेच याच्या सेवनाने उष्णतेपासून आराम तर मिळतोच शिवाय अनेक आजारांपासून दूर राहण्यासही मदत होते. यकृत, रोगप्रतिकार शक्ती आणि रक्तदाब असलेल्या रूग्णांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. अशातच त्यात लिंबू, मीठ आणि पुदिना घाला. यामुळे उसाच्या रसाची चव तर वाढेलच पण तुमच्यासाठी पौष्टिकही होईल. कारण उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असते, परंतु त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यांसारखे पोषक घटक देखील असतात. तथापि, उसाचा रस जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटाशी संबंधित आजार देखील होऊ शकतात.
पण मधुमेहाचे रुग्णही उसाचा रस पिऊ शकतात का? जर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल, तर आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत की मधुमेहाचे रुग्ण उसाचा रस पिऊ शकतात की नाही.
मधुमेहाचे रुग्ण उसाचा रस पिऊ शकतात?
होय! मधुमेही रुग्ण उन्हाळ्यात उसाच्या रसाचा आस्वाद घेऊ शकतात. तथापि, उसाच्या रसाचा आनंद घेण्यासाठी त्यांना काही खबरदारी घ्यावी लागेल. कारण उसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्याच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असते. म्हणून, मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस पिताना काळजी घ्यावी.
डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच उसाचा रस प्या
मधुमेहाने ग्रस्त असलेले लोकांना उन्हाळ्यात उसाच्या रस प्यावासा वाटतो, परंतु ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. ज्या लोकांचा मधुमेह नियंत्रणात आहे ते उसाचा रस खूप कमी प्रमाणात घेऊ शकतात.
गाझियाबादमधील वरिष्ठ डॉक्टर डॉ. व्ही.बी. जिंदाल सांगतात की जे लोकं त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी औषधे घेतात आणि नियमित व्यायाम देखील करतात ती लोकं कमी प्रमाणात उसाचा रस पिऊ शकतात. उसाच्या रसामुळे साखरेची पातळी झपाट्याने वाढते, म्हणून मधुमेही रुग्णांनी ते सेवन करताना काळजी घेतली पाहिजे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List