’95 टक्के महिलांना…’, सेक्सबद्दल नीना गुप्ता यांचं मोठं वक्तव्य, पुरुषांबद्दल म्हणाल्या…
Neena Gupta: बॉलिवूड विश्वातील बोल्ड अभिनेत्री नीना गुप्ता कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. नीना गुप्ता यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. स्वतः नीना गुप्ता यांनी त्यांच्या खासगी आयुष्यात आलेल्या अडचणींबद्दल खुलासा केला आहे. एवढंच नाही तर, नीना गुप्ता त्यांच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात. आता देखील नीना त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आता नीना यांनी भारतीय महिली आणि शारीरिक संबंधांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
नीना गुप्ता म्हणाल्या, ‘भारतात शारीरिक संबंधांना अधिक महत्त्व दिलं जातं. भारतातील 95 टक्के महिलांना माहितीच नाही की, सेक्स म्हणजे एक आनंद आहे…’ सध्या नीना गुप्ता यांचं वक्तव्य तुफान चर्चेत आहे. याआधी देखील त्यांनी अनेकदा चर्चेत राहणारे वक्तव्य केले आहेत.
‘एक अशी वेळ होती जेव्हा सेक्स शब्द बोलताना मी फार कमी आवाजात बोलायची. आता वेळ बदलली आहे. आता मला सेक्स शब्द बोलायला संकोच वाटत नाही. भारतात शारीरिक संबंधांना अधिक महत्त्व दिलं जातं. मला 95 टक्के भारतीय महिलांसाठी फार वाईट वाटतं कारण त्यांना माहिती नाही की सेक्स आनंदासाठी आहे…’
‘महिलांना असं वाटतं की नवऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी आणि मुल जन्माला घालण्यासाठी शारीरिक संबंधांची गरज असते. स्टुडिओत जेवढे लोक आहेत, तेवढेच आम्ही भारतात अल्पसंख्याक आहोत. परंतु बहुतेक लोकांसाठी हे आनंददायक नाही. म्हणूनच ते खूप ओव्हररेट केलेलं आहे.’
स्वतःच्या वयाबद्दल देखील नीना गुप्ता यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या, ‘मी कधीच सांगणार नाही की माझं वय काय आहे. कारण मी माझ्या वयापेक्षा फार तरुण दिसते. आधीच मला वृद्ध महिलांच्या भूमिका मिळतात, अशात माझं वय सांगितल्यानंतर मला कोणत्या भूमिका मिळतील माहीती नाही. म्हणून प्रोफेशनल कारणांमुळे मी माझं वय सांगणार नाही…’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.
नीना गुप्ता यांच्या फिल्मी करीयरबद्दल सांगायचं झालं तर, 1982 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण नीना गुप्ता त्यांच्या फिल्मी करीयरमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या. पण ‘पंचायत’ सिनेमामुळे नीना गुप्ता यांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. आता नीना गुप्ता यांच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत चाहते असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List