रकुल प्रीत सिंगने कॅमेरा पाहताच तोंडावर हात ठेवला; सर्जरी केल्यानं चेहरा बिघडला?
आजकाल बॉलिवूडमध्ये प्लास्टीक सर्जरी करणं हा एक ट्रेंडचं निघाला आहे. अनेक अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी करून आपलं सौंदऱ्य वाढवण्याचा प्रयत्न केला. पण काहींचा यशस्वी झाला तर काहींचा हा प्रयत्न फसला. आता अजून एका अभिनेत्रीबद्दल चर्चा होऊ लागली आहे. ती म्हणजे रकुल प्रीत सिंग.
कॅमेरा पाहून चेहरा लपवला
रकुल प्रीत सिंगने साऊथपासून बॉलीवूडपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही सुंदरी अलीकडेच अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबत ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, रकुलचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तिच्या हातांनी चेहरा लपवताना दिसत आहे. यामुळे नेटकरी बरेच अंदाज लावताना दिसत आहेत.तसेच विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत.
ती पापाराझींना फोटो काढण्यापासून थांबवत होती
व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे रकुल पहिल्यांदा गाडीतून उतरताना दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये ती जिमच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. पण रकुलने कॅमेरा पाहताच तोंडावर लगेच हात ठेवला. तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. तिच्या दुसऱ्या हाताने, ती पापाराझींना फोटो काढण्यापासून थांबवत होती. यानंतर ती पटकन घाईत आत गेल्याचंही पाहायला मिळालं. रकुलचे हे वर्तन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. काही लोक तिला ट्रोलही करत आहे. तर काहींनी तिने प्लास्टिक सर्जरी केल्यानं तिचा चेहरा बिघडले असेल म्हणून ती चेहरा लपवतेय का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.
“बोटॉक्स चुकला वाटतं?”
रकुलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, कमेंट सेक्शनमध्ये लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एका वापरकर्त्याने म्हटले ‘लिप सर्जरी केलीये का? ‘, दुसऱ्याने लिहिले आहे ‘आणखी एक बोटॉक्स चुकला वाटतं’, तिसऱ्याने लिहिले ‘लिप फिलर चुकला का?’ असे अनेक कमेंट्स येताना दिसत आहे.
तिच्या मानेवर एक खूण आहे…
अलिकडेच एका मुलाखतीत रकुलने सांगितलं होतं की तिच्या मानेवर एक खूण आहे, ज्याबद्दल एका उपचारकर्त्याने तिला सांगितले होतं की तिचे हार्ट चक्रा ब्लॉक झालं आहे आणि जेव्हा तिला कोणी तिचा असं सापडेल तेव्हा हा ब्लॉक निघून जाईल. रकुल एकंदरित आध्यातमिक असल्याचं दिसून येत आहे. पण तिने नक्की कॅमेऱ्याकडे पाहून चेहरा का लपवला याचं कारण समजू शकलेलं नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List