फॅशन शोमध्ये लहान मुलाला घेऊन गेल्याने हार्दिक पांड्याची पूर्व पत्नी ट्रोल; नेटकरी म्हणाले ‘किमान मुलाचा तरी..’
क्रिकेटर हार्दिक पांड्याला घटस्फोट दिल्यानंतर मॉडेल नताशा स्टँकोविक तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे. मुलगा अगस्त्यचं संगोपन दोघं मिळून करत असले तरी सध्या हार्दिक आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने मुलगा आई नताशासोबतच अधिक वेळ घालवत आहे. लग्नानंतर आणि मुलाच्या जन्मानंतर कामातून ब्रेक घेतलेल्या नताशाने आता पुन्हा एकदा मॉडेलिंगचं काम करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी एका फॅशन शोमध्ये तिने रॅम्प वॉक केला होता. या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु त्यातील एका गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी नताशाला खूप ट्रोल केलं आहे. रॅम्प वॉक करताना नताशाचा आत्मविश्वास आणि लूक जबरदस्त असला तरी अशा ठिकाणी आपल्या लहान मुलाला घेऊन गेल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.
नताशा तिच्या लाडक्या मुलाला घेऊन या फॅशन शोमध्ये गेली होती. ज्यावेळी ती रॅम्प वॉक करत होती, तेव्हा अगस्त्य प्रेक्षकांमध्ये बसून आईसाठी चिअर करताना दिसला. या कार्यक्रमात अगस्त्यसोबत नताशाचा खास मित्र ॲलेक्झांडर ॲलेक्ससुद्धा बसला होता. नताशा रॅम्प वॉकमध्ये व्यस्त असताना ॲलेक्झांडर अगस्त्यची काळजी घेत होता. परंतु मोठ्यांच्या फॅशन शोमध्ये अशा पद्धतीने लहान मुलांना आणणं काहींना पटलं नाही. ‘ही लहान मुलांची जागा नाही. अशा कार्यक्रमात लहान मुलांना का घेऊन जायचं’, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. हार्दिक आणि नताशा यांचा मुलगा अगस्त्य हा चार वर्षांचा आहे. चार वर्षांच्या मुलाला फॅशन शोमध्ये घेऊन जाणं कितपत योग्य आहे, असंही काहींनी म्हटलंय.
आणखी एका व्हिडीओमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेला अगस्त्य कंटाळलेला दिसून येत आहे. नेमकं याठिकाणी आपण काय करावं, हे समजत नसल्याने तो कंटाळून इथे तिथे बघताना आणि प्रसंगी काऊचवर झोपलेलाही दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून अगस्त्य एकटा पडल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
हार्दिक आणि नताशाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हार्दिक-नताशाने 2020 मध्ये गुपचूप लग्न उरकलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दोघांनी पुन्हा हिंदू आणि ख्रिश्चन विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. नताशाने 30 जुलै 2020 मध्ये मुलाला जन्म दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List