IPL 2025 – “मला आणखी एक संधी द्या…” संघर्षावर स्वार होऊन करुण नायरच दमदार पुनरागमन, वाचा त्याचा थक्क करणारा प्रवास

IPL 2025 – “मला आणखी एक संधी द्या…” संघर्षावर स्वार होऊन करुण नायरच दमदार पुनरागमन, वाचा त्याचा थक्क करणारा प्रवास

आयपीएल 2025 मध्ये रविवारी (13 एप्रिल 2025) झालेल्या मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) सामन्यात करुण नायरने दमदार फलंदाजी करत आपलं नाणं खणखणीत वाजवलं. त्याने मुंबईविरुद्ध 222.50 च्या स्ट्राइक रेटने 40 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 89 धावा चोपून काढल्या. या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला असला तरी, करुण नायरने केलेल्या विस्फोटक खेळीचं सर्व स्तरातून तोंडभरून कौतुक करण्यात आलं. या तुफान खेळीसोबतच त्याचे एक जुनं ट्वीट सुद्धा तुफान व्हायरल होत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये करुण नायरने आपल्या खेळाची झलक वेळोवेळी दाखवली आहे. परंतु टीम इंडियाच्या मुख्य संघात त्याला अद्याप संधी देण्यात आलेली नाही. डिसेंबर 2022 मध्ये त्याने “प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे,” अशी पोस्ट ट्वीटरवर केली होती. त्याची ही पोस्ट त्याच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या खेळीनंतर व्हायरल झाली आहे. करुण नायर टीम इंडियाकडून 2017 साली शेवटचा मैदानात उतरला होता. तत्पूर्वी 2016 साली इंग्लंडविरुद्ध चेन्नई येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याने 303 धावांचा डोंगर उभा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर मात्र त्याचा खेळ सुमार राहीला आणि टीम इंडियाचे दरवाजेही त्याच्यासाठी बंद झाले. परंतु त्याने हार न मानता लढण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या खेळात सातत्य ठेवलं.

विजय हजारे करंडकात विदर्भाकडून खेळताना करुण नायरने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले आणि संघाला फायनलपर्यंत घेऊन जाण्यात खारीचा वाटा उचलला. त्याने आठ डावांमध्ये पाच खणखणीत शतके आणि एका अर्धशतकाच्या जोरावर सर्वाधिक 779 धावा केल्या. फायनलमध्ये विदर्भचा कर्नाटकने पराभव केला असला, तरी करुण नायरने आपल्या खेळाची जादू देशाला दाखवून दिली होती. त्यानंतर रणजी करंडकातही त्याने आपल्या खेळाचा दबदबा कायम ठेवला. विदर्भने फायनलमध्ये अगदी थाटात धडक मारली आणि अंतिम सामन्यात केरळचा पराभव करत करंडक उंचावला. रणजी करंडकात करुणने 16 डावांमध्य चार शतके आणि दोन अर्धशतकांच्या जोरावर 863 धावा केल्या. त्यानंतर आता  आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली आणि त्याने संधीच सोनं करुन दाखवलं. त्यामुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्यांची संघात निवड होण्याची शक्यता वाढली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चीनचा अमेरिकेला मोठा धक्का, बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास केला नकार; होणार मोठे नुकसान चीनचा अमेरिकेला मोठा धक्का, बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास केला नकार; होणार मोठे नुकसान
चीनने आपल्या विमान कंपन्यांना अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगकडून नवीन विमाने न घेण्याचे आदेश दिले आहेत. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, चीनने अमेरिकेत...
मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य
KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय
Photo – नाशकात भगवे वादळ! शिवसेनेच्या निर्धार शिबीरासाठी नाशिक सज्ज