‘या’ फळांचा आकार आपल्या अवयवांशी आहे मिळता-जुळता! ही फळे निरोगी आरोग्यासाठी खायलाच हवीत

‘या’ फळांचा आकार आपल्या अवयवांशी आहे मिळता-जुळता! ही फळे निरोगी आरोग्यासाठी खायलाच हवीत

आपल्याला उपलब्ध असलेल्या, सर्व फळे आणि भाज्या आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात. हिरव्या भाज्या, फळे आणि सुकामेवा इत्यादी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत हे आपल्याला माहित आहे. परंतु केवळ इतकेच नाही तर, फळांचे फायदे त्यांचा रंग आणि आकारही आपल्याला जाणून घेणं हे गरजेचं आहे. बदामाचा आकार डोळ्यासारखा असतो आणि डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर मानला जातो. दोन भिजवलेले बदाम बारीक करून दुधात मिसळून दररोज सेवन केले तर तुमचे डोळे निरोगी राहतात आणि मेंदूलाही शक्ती मिळते. त्याचप्रमाणे संपूर्ण अक्रोडाची साल काढून टाकल्यानंतर बारकाईने पाहिले तर तुम्हाला मेंदूची रचना दिसेल. अक्रोड मधून तोडून दोन भागात विभागले तर ते फुफ्फुसांसारखे दिसू लागते. अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अक्रोड मेंदू आणि फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर मानतात. लिचीचा आकार अंडकोषासारखा असतो आणि तो या अवयवाशी संबंधित आजार बरे करण्यास आणि त्याची क्रियाशीलता वाढविण्यास मदत करतो. हे आकाराबद्दल होते, आता लाल रंगाची फळे आणि भाज्यांबद्दल जाणून घेऊया. ज्यामुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम होते.

सफरचंद
सफरचंदाबद्दल असे म्हटले जाते की, एखाद्या व्यक्तीने दिवसातून एक सफरचंद खाल्ले तर कोणताही आजार त्याच्या जवळ येणार नाही. तसेच त्याला कधीही डॉक्टरची गरज भासणार नाही. सफरचंदांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे माणसाला ऊर्जावान बनवतात. शरीरात रक्ताची कमतरता असेल तर सफरचंद ते खूप लवकर भरून काढते.

 

टोमॅटो
आपल्या शरीराला आवश्यक असलेले बहुतेक पोषक तत्व टोमॅटोच्या रसात आढळतात. टोमॅटोमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे शरीरामध्ये रक्त वेगाने वाढवण्यास सुरुवात होते. एखादी व्यक्ती दररोज टोमॅटो खात असेल तर त्याचा चेहरा उजळ आणि लाल होतो. टोमॅटोमध्ये लायकोपीन, व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, प्रथिने, पोटॅश, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात.

strawberry from kalvan in gujarat

स्ट्रॉबेरी
लाल रंगाच्या गोड आणि आंबट स्ट्रॉबेरीची चव सर्वांनाच आवडते. दररोज स्ट्राॅबेरी खाल्ल्यास व्यक्तीचे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच त्या व्यक्तीचा चेहरा लाल होतो. त्यावर सुरकुत्या येत नाहीत, यामुळे हृदयाचे आरोग्यही सुधारते. स्ट्रॉबेरीमध्ये मॅंगनीज, पोटॅशियम, पेक्टिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉलिक अॅसिड, फॉस्फरस इत्यादी पोषक घटक आढळतात.

बीटरुट
बीटरूटला पोषक तत्वांचा भांडार म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, चरबी, व्हिटॅमिन ए, बी१, बी२, सी, डी, सोडियम, क्लोरीन, फॉलिक अॅसिड, सल्फर आणि आयोडीन इत्यादी असतात. अशक्तपणाचा त्रास होत असेल तर, काही दिवस बीटचे सेवन केल्याने रक्त जलद वाढण्यास मदत मिळते. याशिवाय, मेंदू आणि पाठीच्या कण्याशी संबंधित जन्मजात दोष दूर करण्यासाठी आणि गाठ नष्ट करण्यासाठी बीटरूट उपयुक्त मानले जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चीनचा अमेरिकेला मोठा धक्का, बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास केला नकार; होणार मोठे नुकसान चीनचा अमेरिकेला मोठा धक्का, बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास केला नकार; होणार मोठे नुकसान
चीनने आपल्या विमान कंपन्यांना अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगकडून नवीन विमाने न घेण्याचे आदेश दिले आहेत. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, चीनने अमेरिकेत...
मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य
KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय
Photo – नाशकात भगवे वादळ! शिवसेनेच्या निर्धार शिबीरासाठी नाशिक सज्ज