Night landing at Shirdi Airport : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी, काकड आरतीला पोहचणे झाले सोपे, शिर्डी एअरपोर्टवर नाईट लॅडींगची सुविधा
ईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आता साईबाबांच्या पहाटेच्या काकड आरतीला पोहचणे भक्तांसाठी सहज शक्य झाले आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ( Shirdi International Airport ) रनवेचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यानंतर एअरपोर्टवर रात्रीच्या उड्डाणांना परवागनी देणे सुरु करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या सुविधेने साई भक्तांना एक प्रवासाचा जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. अनेक विमान कंपन्यांनी शिर्डीतून रात्रीचे उड्डाण करण्याची मागणी लावून धरली होती. रात्रीच्या लँडींग फॅसिलीटी सुरु झाल्याने श्री साई दरबारातील पहाटे चार वाजताच्या काकडी आरतीला पोहचणे साई भक्तांना शक्य होणार आहे.
रात्रीची विमान सेवा शुरू
महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी ( एमएडीसी ) आणि संबंधित नियामक संस्थाच्या प्रयत्नांनंतर शिर्डी विमानतळावरुन रात्रीची विमान सेवा सुरु होऊ शकते. गुढी पाडव्याच्या रात्री पहिले उड्डाण हैदराबाद – शिर्डी – हैदराबाद मार्गावर ७८ प्रवासी क्षमतेचे नियमित विमान सेवेच्या रुपात झाले आहे. आता शिर्डी विमानतळावर दरदिवशी एकूण ११ विमानांची ( 22 उड्डाण संचलन ) क्षमता मिळाली आहे.त्यामुळे दरदिवशी सुमारे २२०० प्रवासी ये – जा करु शकता.
धार्मिक पर्यटनाला उभारी
साई दर्शनासोबत शिर्डीच्या पर्यटनातही यामुळे वाढ होणार आहे. ही पायाभूत सुविधेमुळे पर्यटनाला फायदा होणार आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीची विमान सेवा सुरु केल्याच्या निर्णया संदर्भात महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक (एमएडीसी) स्वाती पांडे म्हणाल्या ही सुविधा केवळ हवाई परिवहन क्षेत्रासाठी महत्वपूर्ण तर आहेच शिवाय धार्मिक पर्यटनाला देखील याने उभारी मिळणार आहे. शिर्डीची वाढती लोकप्रियता पाहून भविष्यात आणखी उड्डाणाची संख्या वाढणार असून यामुळे प्रवाशांचा फायदा होणार असल्याचेही स्वाती पांडे यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List